Breaking News

बॅनर लावण्याच्या वादातून गटागटांत तुंबळ हाणामारी, गटातील तरुणावर गोळीबार ! तरुण गंभीर जखमी

 बॅनर लावण्याच्या वादातून गटागटांत तुंबळ हाणामारी,  गटातील तरुणावर गोळीबार !  तरुण गंभीर जखमी


जालना : जालना तालुक्यातील रामनगर येथे दोन गटात वाद झाला आहे. हा वाद इतका वाढला की त्यानंतर दोन्ही गटांत तुंबळ हाणामारी झाली आहे. रात्री बॅनर लावण्याच्या वादातून ही हाणामारी झाली आहे. या हाणामारीत एका गटाने दुसऱ्या गटातील तरुणावर गोळीबार केला आहे. पोटावर गोळी लागल्याने हा तरुण जखमी झाला असून त्याला उपचारासाठी औरंगाबाद येथे हलवण्यात आलं आहे.

या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून घटनास्थळी तणावपूर्ण शांतता आहे. रामनगरमधील शिवसेनेचे कार्यकर्ते शिवाजी शेजुळ आणि रमेश जोशी यांच्यात रात्री रोडवर बॅनर लावण्याचा कारणावरून वाद झाल्याची घटना घडली होती. या वादाचं रूपांतर सकाळी मोठ्या हाणामारीत झालं आणि दोन्ही गट आमने सामने आल्याने दोन गटात हाणामारी झाली.

या वादात रमेश जोशी यांनी शेजुळ गटाच्या तरुणावर गोळीबार केल्याची प्राथमिक माहिती समोर आलीय. या गोळीबारात हा तरुण गंभीर जखमी झाला आहे. विजय ढेगळे असं जखमी झालेल्या तरुणाचं नाव असून त्याच्या पोटात गोळी लागल्यानं हा तरुण गंभीर जखमी झाला आहे.

या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटना स्थळी दाखल झाले असून परीसरात तणावपूर्ण शांतता आहे. दरम्यान गोळीबारात जखमी झालेल्या तरूणाला पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथे हलवण्यात आलं असून परिस्थिती नियंत्रणात आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत