वाढदिवसपर्वा निमित्त गोरगरिबांना अन्नदान व मिष्ठान्न वाटप..
वाढदिवसपर्वा निमित्त गोरगरिबांना अन्नदान व मिष्ठान्न वाटप..
महा घडामोडी न्यूज नेटवर्क,अकोला : स्थानिक मानवसेवा फाउंडेशन व सामाजिक सार्वजनिक मंडळ अकोला यांच्या संयुक्त आज माऊली कार्डीयाक एम्ब्युलन्स चे संचालक श्री प्रवीण दादा हुशे तसेच आपुलकी फाउंडेशन अकोला चे शिवकुमार गौर यांच्या वाढदिवसपित्यर्थ गोरगरिबांना मिठाई व अन्नदान चे वाटप करण्यात आले.
साप्ताहिक शनिवार व रविवारी मानवसेवा फाउंडेशन तर्फे सकाळी जिल्हा स्त्री रुग्णालय (लेडी हार्डिंग हॉस्पिटल ) अकोला येथे अन्नदान हा सामाजिक उपक्रम राबविण्यात येतो.
रुग्णालय परिसरातील रुग्ण व त्यांचे नातेवाईक यांच्याकरिता सदर उपक्रम राबविला जातो यामध्ये सकाळी पोळीभाजी, खिचडी, फराळ तर विशिष्ट दिवशी गोडधोड मिष्ठान्न सुद्धा उपलब्ध करून देण्यात येते.
या प्रसंगी प्रवीण भाऊ हुशे व शिवकुमार गौर यांच्या शुभ हस्ते मिठाई व अन्नदानचे वाटप करण्यात आले तसेच आपुलकी फाउंडेशन च्या सौ.जानव्ही राठोड यांचा पुष्पगुछ देऊन सत्कार सुद्धा करण्यात आला.
यावेळी अन्नदानाचा सर्व खर्च श्री गोपाल भाई अग्रवाल तसेच मिठाईचा खर्च श्री वसंतराव खोलकुटे दादा यांनी केला..
कार्यक्रम चे प्रास्ताविक राहुल खंडाळकर यांनी तर आभार प्रदर्शन श्री.विवेक सातपुते सर यांनी केले.
उपस्थितां मध्ये राजेशभाऊ धनगावकर, विवेक सातपुते, (संचालक गुरुकुल एकॅडमि) राहुल खंडाळकर, सौ, जानव्ही राठोड, शिवकुमार गौर, सीतारामजी मुंदडा, दिपक होले, सुधीर ओहेकर, रवी जाधव, शुभम होले, प्रितेश वानखडे (संस्थापक अध्यक्ष आपुलकी फाउंडेशन ) शुद्धोधन इंगळे, आशिष पाटील, शुभम डोंगरे, हर्षल ठाकूर, व श्रीकृष्ण सरोदे तथा सर्व मानवसेवा फाउंडेशन, आपुलकी फाउंडेशन अकोला चे सदस्य कार्यकर्ते सहभागी होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत