Breaking News

वीज वितरण कंपनीने गाव खेड्यातील रस्ता लाईट बंद केल्याने अंधाराचे साम्राज्य

अर्जुनी-मोर तालुका अंधारात

वीज वितरण कंपनीने गाव खेड्यातील रस्ता लाईट बंद केल्याने अंधाराचे साम्राज्य



महा घडामोडी न्युज जिल्हा प्रतिनिधी,संतोष रोकडे, गोंदिया : गोंदिया जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर आदिवासीबहुल दुर्गम व नक्षलग्रस्त तालुका म्हणून शासन दरबारी अर्जुनी-मोर तालुक्याची नोंद आहे अर्जुनी-मोर तालुक्यातील अनेक गावे जंगलाला लागून असल्याने जंगली श्वापदांचा त्रास दिवसेंदिवस वाढत आहे रस्त्यावरील विद्युत पुरवठा खंडित झाल्याने जंगलालगत असलेल्या रहिवाशांना जंगली श्वापदांचा त्रास वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे विद्युत वीज वितरण कंपनीचे ग्रामपंचायत कडे विद्युत बिल थकित असल्याने महावितरण कंपनीने गाव खेड्यातील विद्युत पोलवरील वीज पुरवठा खंडित केल्याने संपूर्ण अर्जूनी मोर तालुका रात्रीच्या वेळी अंधारात राहण्याची वेळ आली आहे मागील सहा महिन्यापूर्वी सुद्धा वीज वितरण कंपनीचे विद्युत देयके अर्जुनी-मोर तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींकडे थकीत असल्याने रस्त्यावरील विद्युत खांबावरील विद्युत पुरवठा खंडित केला होता त्यामुळे त्यावेळी सुद्धा जवळपास दोन महिने अर्जुनी-मोर तालुक्यात सर्वत्र अंधार पसरलेला होता त्यावेळी सुद्धा अर्जुनी मोर तालुका सरपंच उपसरपंच महा सेवा संघाने आमदार साहेबांच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले होते त्यावेळी आमदार मनोहरराव चंद्रिकापुरे यांनी महावितरण कंपनीला काही दिवसात थकित असलेले विद्युत बिल देण्यात येईल असे आश्वासन दिल्याने महावितरण कंपनीने वीज पुरवठा सुरू केला होता मात्र महावितरण कंपनीला थकित असलेले विद्युत बिल भरणा न झाल्याने पुन्हा वीज पुरवठा खंडीत करण्यात आला त्यामुळे अर्जुनी-मोर तालुक्यातील सर्व गावे अंधारात गेलेली आहेत गावे अंधारात जात असल्याने सर्व सरपंच प्रशासनाविरुद्ध आक्रोश करीत आहेत तसेच खंडित वीज पुरवठा सुरू करण्याची मागणी अर्जुनी-मोर सरपंच उपसरपंच महा सेवा संघाकडून केली जात आहे.

प्रतिक्रिया

अर्जुनी-मोर तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत कडे रस्त्यावरील विद्युत थकबाकी असल्याने मागील सहा महिन्यापूर्वी महावितरण कंपनीने विद्युत पुरवठा खंडित केला होता त्यावेळी अर्जुनी-मोर विधानसभा क्षेत्राचे आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांच्या कार्यालयासमोर अर्जुनी-मोर सरपंच-उपसरपंच महा सेवा संघाच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले होते त्याची दखल आमदार महोदयांनी घेऊन निधी उपलब्ध करून महावितरणला देयके देण्यात येतील असे आश्वासन दिल्याने महावितरण कंपनीने विद्युत पुरवठा सुरू केला होता मात्र आश्वासन पूर्ण न झाल्याने महावितरण कंपनीने पुन्हा विद्युत पुरवठा खंडित केल्याने अर्जुनी-मोर तालुक्यातील गावे अंधारात गेलेली आहेत तरी आमदार महोदयांनी वरिष्ठ स्तरावरून निधी उपलब्ध करून द्यावा जेणेकरून कोणताही गाव अंधारात राहणार नाही.

 अध्यक्ष सरपंच उपसरपंच महा सेवा संघ अर्जुनी-मोर भोजराज लोगडे

या संदर्भाने अर्जुनी-मोर विधानसभा क्षेत्राचे आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क केला असता मी विधानसभेत आहे हा प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न सुरू आहे लवकरात लवकर निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नवत आहे.  
विधानसभा क्षेत्र आमदार मनोहर चंद्रिकापुरे

आमची वस्ती ही जंगलाला लागून असल्याने सदोदित जंगली प्राण्यांच्या दहशतीखाली जीवन जगत आहोत विद्युत पोल वरील लाईट सुरु असताना सुद्धा जंगली श्वापदे त्रास देत असतात आता तर विद्युत खांबावरील वीज पुरवठा खंडित झाल्याने जीव मुठीत घेऊन जगावे लागणार आहे त्यामुळे लवकरात लवकर वीज देयके अदायगी करावे जेणेकरून आम्हाला अंधारात जीवन जगावे लागणार नाही. 
वयोवृद्ध वामन करंबे रहिवासी हनुमान नगर ईसापुर

शासन निर्णयानुसार ग्रामपंचायत कडे थकित असलेले ग्रामपंचायत निहाय विद्युत देयके प्राप्त करून घेण्याची कार्यवाही अंतिम टप्प्यात असून सदर मागणीनुसार निधीची मागणी जिल्हा प्रशासनाकडे करण्यात येईल निधी प्राप्त होताच महावितरण कंपनीला थकित असलेले विद्युत देयके अदायगी करण्यात येईल.

 अर्जुनी-मोर पंचायत समिती गटविकास अधिकारी विलास निमजे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत