Breaking News

अल्पवयीन चोराला अटक, दागिन्यांसह पाच लाखांचा मुद्देमाल जप्त

 अल्पवयीन चोराला अटक, दागिन्यांसह पाच लाखांचा मुद्देमाल जप्त


महा घडामोडी न्यूज नेटवर्क, नागपूर : राज्याच्या उपराजधानीत गुन्हेगारी थांबण्याचे नावच घेताना दिसत नाही आहे. तर दुसरीकडे गुन्हेगारांना आळा घालण्यासाठी नागपूर पोलिसांनीही आता कंबर कसली आहे. प्रत्येक गुन्ह्याचा पोलिस कसून तपास करीत आहेत. अशाच गुन्ह्याचा तपास करत असताना पोलिसांनी एका अल्पवयीन चोरट्याला अटक केली आहे. पोलिसांनी या चोरट्याची कसून चौकशी केली असता तो पोलिस रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी आरोपीकडून जवळपास पाच लाख रुपये किमतीचे दागिने आणि इतर मुद्धेमाल जप्त केला.

नागपूर तहसील पोलीस स्टेशन परिसरात चोरी घटना वाढल्यामुळे पोलिसांनी कंबर कसली आणि एका तपासात एक अल्पवयीन आरोपी त्यांच्या हाती लागला. त्याचा रेकॉर्ड बघितला तर तो रेकॉर्डवरील चोरटा असल्याचे उघड झाले. पोलिसांनी त्याला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने आपल्या साथीदाराच नाव सांगितलं आणि पोलिसांनी त्याला सुद्धा अटक केली. पोलिसांनी आरोपींकडून सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह जवळपास पाच लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत