विसापूर मध्ये देण्यात येणाऱ्या नळ सेवेची वेळ प्रभागा प्रमाणे सुनिश्चित करून नळ द्या - संदीप पोडे
भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष यांचे विसापूर ग्रामपंचायत ला निवेदन
महा घडामोडी न्यूज नेटवर्क चंद्रपूर : विसापूर मध्ये देण्यात येणाऱ्या नळ सेवेची वेळ प्रभाग प्रमाणे सुनिश्चित करून नळ देन्याची मागणी आशिष देवतळे जिल्हा अध्यक्ष भाजपा युवा मोर्चा यांचा मार्गदर्शनातं संदीप पोडे भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष यांनी ग्रामपंचायत विसापूर कडे मागणी ,विसापूर गावातील नागरिक दैनिक कामाला बाहर जातात. गावामध्ये रोजगार उपलब्ध नाहीत. त्या मुळे गावातील नागरिकांना बाहर रोजगार्करती रोज जाण येणा करावं लागते.
तर आपल्या गावातील काही नागरीक शेती करता शेती मध्ये जाणाऱ्या महिला असो किंवा बाहर रोजगारा करिता जाणाऱ्या महिला असो. त्यांचं दिवस पूर्ण बाहर जाते नळांचा वेळ सुनिश्चित नसल्याने त्यांना जेव्हा नळ येतात तेव्हा त्यांचा उनुपस्थिती असते व त्यांना पाणी मिळत नाही तरी आपण वेळ सूनुचित केली तर सर्वांना पाणी मिळेल व नळ सेवेचा लाभ सर्वांना मिळेल तरी आपणास हि वनती आहे कि नळ सेवेचा वेळ सुनिश्चित करून पाणी पुरवठा करावा हि विनंती या प्रकारच मग इच्छे निवेदन भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष संदीप पोडे यांनी मागितली आहे. या मागणीकडे सर्व विसापूर वासियांचे लक्ष वेधलेले आहे. व ग्रामपंचायत सुद्धा लक्ष देतील अशी अपेक्षा देखील लगलेली आहे . या सम्यस्याचे समाधान झाल्याने नागरिकांचा त्रास कमी होईल.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत