Breaking News

ग्राम विकास सोसायटी वर मंगेश पाचभाई व नेताजी पारखी सर गटाचा विजय

ग्राम विकास सोसायटी वर मंगेश पाचभाई व नेताजी पारखी सर गटाचा विजय

सर्व पक्ष मिळून अभद्र युती युती करणाऱ्या गावपुढार्यांना जनतेचे चपराक

13 पैकी 13 उमेदवार विजयी

झरी जामणी तालुक्यातील अडेगाव येथील ग्राम विविध सहकारी संस्था निवडणूक 2022 



महा घडामोडी न्युज नेटवर्क,यवतमाळ : ग्राम विकास कार्यकारी सहकारी संस्था मर्यादित अडेगाव येथील निवडणूक हे लक्षणीय होती . या निवडणुकीमध्ये अनेक दिगग्ज राजकारणी एकत्र येत अभद्र युती करत त्याची लढत मंगेश पाचभाई , नेताजी पारखी यांच्या परिवर्तन पॅनेल सोबत थेट होती . निवडणुकीमध्ये परिवर्तन पॅनेल कडून सर्वसामान्य शेतकरी घरातील घराणेशाही च्या बाहेरील उमेदवार उभे होते . याच परिवर्तन पॅनल च्या माध्यमातून तेरा पैकी तेरा उमेदवार परिवर्तन पॅनल चे निवडून आले .

 यामध्ये सर्व पक्षांनी आपला जोर लावत गावातील अभद्र युती करून पॅनल तयार केले . सोबतच गावातील घराणेशाही राजकारण करत पुढारी लोकांनी आपल्या घरचे किंवा जवळच्याना उमेदवारी दिली .
मात्र अडेगाव - रामपूर - येडशी येथील जागृत मतदारांनी ग्राम विकास कार्यकारी सहकारी संस्था मर्यादित निवडणुकीमध्ये घराणेशाही च्या विरोधात करारा जवाब देता सर्व जागृत मतदाराणी धडा शिकवला .

यामध्ये युवा नेते मंगेशभाऊ पाचभाई , नेताजी पारखी सर यांनी आपल्या पॅनल ला एक तर्फा विजय मिळवत सर्व घराणेशाहीच्या विरोधात तसेच राजकीय पक्षाच्या विरोधात ग्राम विकास कार्यकारी सहकारी संस्था मर्यादित अडेगाव निवडणुकीमध्ये आपला विजयाचा झेंडा रोवला .

यात सर्वसाधारण गटातुन नेताजी पारखी , शंकर पाचभाई , प्रणाल गोंडे , योगेश बेलेकर , राजू चौधरी , रमेश गाडामोडे , नागोजी मोहितकर , लक्ष्मण भोयर तर राखीव गटातून लक्ष्मण केलझरकर , गोविदा पुरके , सुधारकर आसुटकार तर महिला गटातुन विमल नगराळे , सिंदुबाई ठाकरे विजय झाले . सोबतच पानघाटे , हिवरकर , गटाचा दारुण पराभव झाला . सोबतच 
यात आमदाराचा दत्तक गावात ग्रामपचायत सोबत सोसायटी भारतीय जनता पार्टी च्या हातातून गेल्यानं सर्व प्रस्तापिताण धक्का बसला असून युवा नेते मंगेश पाचभाई , नेताजी पारखी , गोविंदा उरकुडे , सीताराम पिंगे , सखाराम ठेंगणे , सीमा लालसरे ,राहुल ठाकूर , गणेश पेटकर , संतोष पारखी , विजू लालसरे , संतोष लेडांगे नानाजी धोटे , गिरीधर राऊत सोबत समस्त ग्रामवासी सहकार्याला होते .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत