डॉक्टरने केली पत्नीची हत्या
आई व बहीण यांनी नियोजनबद्ध कट रचून प्रियंकाची हत्या,
हत्या करुन पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न
महा घडामोडी न्यूज नेटवर्क अमरावती : शहरातील राधानगरातील डॉ. पंकज दिवाण यांची पत्नी प्रियंकाचा मृतदेह आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती. २० एप्रिलला सकाळी ही घटना घडली होती. तिची हत्या झाली की आत्महत्या केली? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. या प्रकरणी तपासात पोलिसांच्या हाती काही महत्त्वाचे धागेदोरे लागले. ज्यात अनेक बाबी उघड झाल्याने पोलिसांनी डॉक्टरसह त्याची आई व बहिणीवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
प्रियंकाच्या माहेरच्या नातेवाइकांनी मृत्यूबाबत संशय व्यक्त केला होता. यानंतर प्रियंकाच्या मृतदेहाचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदन करण्यात आले. प्रियंकाच्या डोक्यात अंतर्गत जखमा व रक्तस्त्राव तसेच श्वास गुदमरून मृत्यू झाल्याचे शवविच्छेदन अहवालातून समोर आले. यानंतर गाडगेनगर पोलिसांनी बुधवारी रात्री डॉ. पंकज दिवाण, त्याची आई व बहिणी विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात मृत प्रियंकाची बहीण प्रगती रमेश कातकीडे यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
राधानगरमध्ये आहे डॉ. पंकज दिवाणचे घरवजा रुग्णालय प्रियंकाच्या मृतदेहापासून काही अंतरावरच एक फुटलेले अॅम्पुल व चार ते पाच सिरींज सापडल्या होत्या. यातील अॅम्पुलमध्ये तसेच काही सिरींजमध्येही औषध होते. याचा वापर प्रियंकाच्या शरीरावर झाला का? झाला असल्यास तो कोणी केला, ते औषध कशासाठी वापरले जाते. तिच्या हाताला इन्ट्राकॅथ कोणी लावली, या सर्व प्रश्नांची उत्तरं अजून गुलदस्त्यात आहेत. सिरींज व अॅम्पूलचा फॉरेन्सिककडून अहवाल आल्यानंतर इंजेक्शन व सिरींजचा या प्रकरणातील समावेश समोर येणार आहे.
लग्नानंतर दोन ते तीन महिने तिला चांगले वागवले. त्यानंतर मात्र प्रियंकाला लहान सहान गोष्टीवरुन त्रास देत होते. तसेच डॉ. पंकजची आई व बहीणही छळत होते. दरम्यान २२ फेब्रुवारी २०२२ ला प्रियंका या माहेरी आल्या होत्या. डॉ. पंकजच्या सांगण्यानुसार साडेतीन लाख रुपये वडिलांकडे मागितले होते. त्यावेळी प्रियंकांच्या वडिलांनी तीन लाखांचा चेक दिला होता. डॉ. पंकज त्यांना त्रास देता होता. डॉ. पंकजला पहिल्या पत्नीला पुन्हा घरात आणायचे होते. यामुळे प्रियांका यांनी घरातून निघून जावे यासाठी डॉ. पंकजने छळ सुरू केल्याचा आरोप तक्रारीत केला आहे. त्यामुळे प्रियंकाची हत्या झाल्याचा संशय घटनेच्या दिवसापासून होताच. प्रियंकाच्या डोक्याला अंतर्गत जखमा असून रक्तस्त्राव तसेच जीव गुदमरून मृत्यू झाल्याचे प्राप्त शवविच्छेदन अहवालातून समोर आले आहे. त्यामुळे डॉ. पंकज दिवाण, त्याची आई व बहीण यांनी नियोजनबद्ध कट रचून प्रियंकाची हत्या करुन पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिली माहितीया तक्रारीवरून गाडगे पोलिसांनी डॉ. पंकज दिवाणसह तिघांविरुद्ध कट रचून खून करणे, तसेच पुरावा नष्ट करणे या कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. आता तिन्ही आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत