Breaking News

राहुल पेंढारकर राज्यस्तरीय आदर्श समाजसेवा पुरस्काराने सन्मानित

राहुल पेंढारकर राज्यस्तरीय आदर्श समाजसेवा पुरस्काराने सन्मानित


(महा घडामोडी न्यूज जील्हा प्रतीनीधी) संतोष मडावी, चंद्रपूर : तालुक्यातील करंजी गावची ओळख सर्वदूर सुपरिचीत आहे. सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीयदृष्ट्या हे गाव पुढारलेले आहे.अश्यातच गावच्या राहूल पेंढारकर यांचा सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल नुकताच हिवरेबाजार येथे सत्कार करण्यात आला आहे.


राज्य सरपंच परिषद मुंबई यांच्यातर्फे यंदापासून राज्यात ग्रामविकासासाठी योगदान देत काम करणाऱ्या  लोकप्रतिनिधी,अधिकारी,सरपंच,समाजसेवक आणि ग्रामसेवकांना पुरस्कार देण्याचा उपक्रम सुरु केला आहे.त्यासाठी राज्यातून तब्बल ९५० प्रस्ताव सादर करण्यात आले.यामधून सामाजिक क्षेत्रातील पूरस्कार नुकतेच जाहीर करण्यात आले.यात आदिवासी अतिदुर्गम भागात केलेल्या सामाजिक,शैक्षणिक कार्याची दखल घेत राहुल पेंढारकर यांना राज्यस्तरीय आदर्श समाजसेवा पुरस्कार' पद्मश्री पोपटरावजी पवार यांचे हस्ते प्रदान करण्यात आले. 


सन्मानचिन्ह,शाल,सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते.राहूल मुळचा गोंडपिपरी तालुक्यातील करंजी गावचा.यानंतर परिवारासह गडचिरोली जिल्ह्यात रहायला गेल्याने तिथेच आपल्या सामाजिक कार्याची सुरवात केली.सामाजिक क्षेत्रातील या पुरस्काराची घोषणा परिषदेचे अध्यक्ष दत्ता काकडे,सरचिटणीस विकास पाटील,आबा सोनवणे,अंजना येवले,ज्ञानेश्वर पठारे,नाना डोंगरे यांनी केली.कल्याण डोंबिवली महापालिकेचे आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी,अंमलबजावणी संचालनालयाचे सहआयुक्त उज्वल चव्हाण,कृषी विभागातील सहसंचालक रफिक नाईकवाडी यांचा ‘उत्तम प्रशासक’ म्हणून तसेच राज्यातील दहा सरपंच,पाच आदर्श ग्रामपंचायती आणि पाच आदर्श ग्रामसेवकांचा गौरव करण्यात आला.


२२ एप्रिल रोजी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते व पद्मश्री पोपटराव पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुरस्कार वितरण सोहळा पार पडला.शेती,सहकार,ग्रामविकासाठी योगदान दिल्याबद्दल सरपंच परिषद मुंबई (महाराष्ट्र) यांच्यातर्फे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण,माजीमंत्री आमदार सुरेश धस,प्रशांत बंब व नीलेश लंके यांना ‘यशवंतराव चव्हाण आदर्शलोक प्रतिनिधी’ पुरस्कार जाहीर करण्यात आले.या शिवाय ‘उत्तम प्रशासक’ म्हणून तीन प्रशासकीय अधिकारी,सरपंच,ग्रामसेवक व आदर्श ग्रामपंचायतींनाही पुरस्काराने गौरविण्यात आले.आदर्शगाव हिवरेबाजार येथे पुरस्कार वितरण करण्यात आले.



"राष्ट्रसंताच्या पदस्पर्शाने पावन करंजी गावच्या मातीचा सहवास मला लाभला आहे.येथून सामाजकार्य करण्याची उर्जा मला मिळाली.समाजकारणाचा हा वसा अविरत सुरु राहिल. राहूल पेंढारकर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत