Breaking News

असंवेदनशील शासनामुळे शेतकऱ्यांची आत्महत्या

असंवेदनशील शासनामुळे शेतकऱ्यांची आत्महत्या

प्रहार चे रुग्णसेवक जिवन तोगरे यांच्या आरोप


महा घडामोडी न्युज तालुका प्रतिनिधी,शेख हक्कानी, जिवती : अतिदुर्गम आदिवासी भाग म्हणून ओळखला जाणारा जिवती तालुक्यातील तेलंगणा सीमेला लागून नारायण गुडा येथील घटना सततच्या कर्जबाजारीपणामुळे माधव जळबा वाघमारे वय ६० वर्षे या शेतकऱ्यांनी शेतातच आज सकाळी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती सुदामभाऊ राठोड जय विदर्भ पार्टीचे जिल्हा प्रभारी चंद्रपूर यांनी दिली,महाविकास आघाडी सरकारच धोरण फक्त शेतकऱ्यांच मरण हाच दिसत आहे, 


जिवती तालुक्यातील शेतकऱ्यांना कोणत्याही योजनेचा लाभ घेता येत नाही व कोणतेही अनुदान सरकार कडून मिळत नाही म्हणून खाजगी सावकाराकडून कर्ज काढून जगावं लागत आणि कर्ज घेऊनच शेती करावं लागतं वरून शेतमालाला भाव मिळत नाही आणि निसर्गाचं मार मग हा शेतकरी जगावं तरी कसं पण कोणी यावर विचार करत नाही. 


शेतकरी आत्महत्या का करत आहे या मागच कारण काय खोलवर जाऊन कोणीच बघत नाही, शेतकरी आत्महत्येचा मूळ कारण म्हणजे जमिनीचे पट्टेचा आहे शासनाने जर तालुक्यातील शेतकऱ्यांना जमिनीचे पट्टे वाटप केले तर 99% शेतकरी आत्महत्या थांबेल कारण ज्यांच्याकडे पट्टेच नाही त्यांना कोणतीच योजनेचा लाभ घेता येत नाही कोणताही अनुदान त्यांना मिळत नाही, मग त्यांना कर्जापायी एकच मार्ग दिसतो तो म्हणजे आत्महत्या?


मग महाविकास आघाडी सरकारच धोरण काय? फक्त शेतकऱ्यांचा मरण हाच का असा प्रश्न जय विदर्भ पार्टीचे जिल्हा प्रभारी सुदामभाऊ राठोड यांनी उपस्थित केला आहे?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत