Breaking News

गोजोलीतील युवा शेतकऱ्याची गळफास घेत आत्महत्या

गोजोलीतील युवा शेतकऱ्याची गळफास घेत आत्महत्या

गोंडपिपरी तालुक्यातील घटना


महा घडामोडी न्युज जिल्हा प्रतिनिधी संतोष मडावी, चंद्रपूर, धाबा : गोंडपिपरी तालुक्यातील गोजोली येथील युवा शेतकरी कर्जबाजारीपणाला कंटाळत आत्महत्या केली. सदर घटना दि.24 एप्रिल रोजी सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली. आत्महत्या ग्रस्त युवकाचे नाव संतोष वामन डोंगरे वय 41 वर्ष, आहे.


सततची नापिकी, व वाढत चाललेला कर्जाचा डोंगर या ओझ्याखाली सतत जिवन जगत असताना असह्य होत मृतक संतोष हा स्वतः च्या शेतातील आसलेल्या आंब्याच्या झाडाला गळफास घेत जीवनयात्रा संपवली. त्याच्या पश्चात पत्नी, दोन लहान मुले, भाऊ आणि आई असा बराच मोठा आप्त परिवार आहे.संतोषच्या अवेळी जाण्याने गावात शोककळा पसरली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत