बीडीओची निमणी येथील निवासी शिबिराला भेट
बीडीओची निमणी येथील निवासी शिबिराला भेट
गावं फेरी करून केली पाहणी
महा घडामोडी न्युज जिल्हा प्रतिनिधी संतोष मडावी, चंद्रपूर, बाखर्डी : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत निमणी येथे चार दिवसीय दस वार्षिक सूक्ष्म आराखडा निवासी शिबीर सुरू असून कोरपना पंचायत समिती गटविकास अधिकारी दिलीप बैलनवार यांनी नुकतीच भेट देऊन गावाची पाहणी केली तसेच दस वार्षिक सूक्ष्म आराखड्याची तपासणी केली शोषखड्डे रेन हार्वेस्टिंग नळ योजना घरोघरी शौचालय नाडेप टाके कर वसुली व सौरऊर्जेचा वापर याबाबत ग्रामपंचायतला मार्गदर्शक सूचना केल्या.
यावेळी सरपंच सीमा जगताप उपसरपंच उमेश राजूरकर ग्रामसेवक एस डी ढवळे सहायक कार्यक्रम अधिकारी पंकज साखरकर प्रशांत भोयर अजय गजपुरे प्रभाग समन्वयक ज्ञानेश्वर अनवेनवार तालुका सहाय्यक एस एस गेडाम प्रक्षेत्र अधिकारी शंकर आत्राम सीडीइओ शैलेश लोणकर शुद्धोधन जगताप ग्रामरोजगार सेवक काशी पेठा आतिष पिदूरकर आदी उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत