नाल्यात चूहा खोदून गावकरी भगवितात तहान
नाल्यात चूहा खोदून गावकरी भगवितात तहान
पाणीपुरवठा योजना ठरली कुचकामी
अशुद्ध पाण्याचा पुरवठा
लवकरात लवकर तालुक्यात शुद्ध पाण्याचा पुरवठा करा, अन्यथा वंचित बहुजन आघाडीचा आंदोलनाचा इशारा
महा घडामोडी न्युज जिल्हा प्रतिनिधी संतोष मडावी चंद्रपूर, गोंडपीपरी : अन्न,वस्त्र,निवारा ह्या मानवाच्या मूलभूत गरजा आहेत यासोबतच पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे हा सुद्धा घटनादत्त अधिकार आहे.मात्र प्रादेशिक पाणीपुरवठा योजना सकमुर अंतर्गत गेल्या अनेक वर्षांपासून पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या नांदगाव हेटी नांदगाव, टोले नांदगाव, गावात शुद्ध पाणी पुरवठा होत नसल्याने येथील नागरिक जवळील नाल्यात चुहा खोदून त्यातील पाणी पीत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.एवढंच नाही तर या गावात पिण्याचे पाणी नाही म्हणून या चार गावातील मुलांना विवाहासाठी वधू पक्षाकडून मुली देण्यासाठी चक्क नकार दिला जातो. सात दिवसाच्या आत शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा न केल्यास तीव्र आंदोलन केल्या जाईल असा इशारा निवेदन मार्फत दिनांक 22 एप्रिल रोजी शुक्रवारला वंचित बहुजन आघाडी तालुका गोंडपिपरी च्या वतीने पंचायत समितीचे संवर्ग विकास अधिकारी यांना देण्यात आला. गोंडपीपरी येथील शासकीय विश्राम गृहात पत्रकार परिषद घेऊन वंचित बहुजन आघाडी चे जिल्हा अध्यक्ष यांनी हि माहिती दिली.
समकुर येथिल प्रादेशिक पाणीपुरवठा योजनंतर्गत चेक नांदगाव, हेटीनांदगाव टोले नांदगाव चेक नांदगाव या गावाना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो मात्र या योजनेतुन नियमित पाणीपुरवठा होत नाही तर कधी वीजपुरवठा खंडित राहत असल्याने आठवडा आठवडा या गावात पाणी मिळत नाही.
जागोजागी पाईप लाईन लिकेज असल्यामुळे दूषित पाणीपुरवठा केला जातो त्यामुळे या परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे विविध रोगांची लागण होण्याची दाट शक्यता असल्याने येथील नागरिक गावाच्या बाजूला वाहणाऱ्या नाल्याचे पाणी पिवून तहान भागवित असतात.
यासाठी नाल्यात चुवा खोदुन तेथील पाणी पिण्यासाठी वापरने हे येथील नागरिकाचे नित्याचे झाले आहे सदर पाणीपुरवठा योजनेतुन पाणी पुरवठा नियमित होत नसल्याने व पाण्याची टंचाई असल्याने पाण्यासाठी वणवण करावी लागत असल्याने या परिसरातिल मुलांना लग्न करण्यासाठी मुली सुद्धा नकार देत असल्याचे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले.
अश्यातच शुक्रवारला वंचित बहुजन आघाडी तालुका गोंडपिप्री च्या वतीने निवेदन देऊन व पत्रकार परिषद घेऊन येणाऱ्या सात दिवसात या समस्यावर सकारात्मक तोडगा काढून गावकऱ्यांना शुद्ध पाणी पुरवठा करण्यात यावा असे न झाल्यास वंचित बहुजन आघाडी च्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष भूषण फुसे प्रकाश तोहगावकर तालुका अध्यक्ष , सुरेश दुर्गे,भारत चंद्रगडे, तालुका उपाध्यक्ष लक्ष्मण रामटेके , अविनाश राऊत अनिल दुर्गे संदेश निमगडे सुधाकर तांगडे दिगाबंर येलमुले यासह वंचित बहुजन आघाडी चे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत