हातात तलवार घेऊन दहशत पसरविणार्या इसमास गोंडपीपरी पोलिसांनी केली अटक
हातात तलवार घेऊन दहशत पसरविणार्या इसमास
गोंडपीपरी पोलिसांनी केली अटक
(महा घडामोडी न्यूज जील्हा प्रतीनीधी) संतोष मडावी, चंद्रपूर : गोंडपीपरी शहरातील पंचशील वार्डात हातात तलवार घेऊन दहशत पसरवीनार्या इसमास गोंडपीपरी पोलिसांनी अटक केल्याने एकच खळबळ उडाली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात गोळीबार, हत्या, बलात्कार लूटमार मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे पोलीस प्रशासन सतर्क झाले आहे.
पोलीस अधिक्षक अरविंद साळवे ,अप्पर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी जिल्ह्यात अवैध धंदे व अवैध हत्यार बाळगनाऱ्याची माहिती काढून त्यावर कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आले.
गोंडपीपरी शहरातील पंचशील वार्डात हातात तलवार घेऊन दहशत पसरवित असल्याच्या माहितीवरून (दि.29 ) गोंडपीपरी पोलिसांनी दहशद घालणाऱ्या इसमाच्या घरी केलेली छापेमारीत सुनील केशव देवगडे यांच्या बाथरूमच्या लॉप्टवर 70 सेमी लांबीची धारदार लोखंडी तलवार आढळल्याने त्यास ताब्यात घेऊन भारतीय हत्यार अधिनियम कलम 4,5,25 आणि 27 प्रमाणे कारवाई करण्यात आली.
सदर कारवाई मल्लिकार्जुन इंगळे, उपविभागिय अधिकारी मूल, यांच्या मार्गदर्शनात गोंडपीपरी पोलीस स्टेशनचे ठानेदार जीवन राजगुरू, पोलीस हवालदार पुरषोत्तम उईके,विलास कोवे,पोलीस शिपाई रतन चव्हाण, अनिल चव्हाण यांनी केली.

.jpeg)

कोणत्याही टिप्पण्या नाहीत