अग्निशमन वाहन आणून नागरिकांचे होणारे नुकसान टाळा ; राष्ट्रवादी
अग्निशमन वाहन आणून नागरिकांचे होणारे नुकसान टाळा ; राष्ट्रवादी
महा घडामोडी न्युज नेटवर्क बोदवड :
शहरात २३ एप्रिल ला मलकापूर रस्त्यावरील एका मिरची कांडप कारखान्याला आग लागली होती. त्यात कडू माळी यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यावेळी टँकर ने आग विजवण्यात आली असता आग आटोक्यात येत नसल्याने जामनेर व वरणगाव येथून अग्निशमन विभागाचे वाहन बोलवून अग्निशमन वाहनाने ती आग आटोक्यात आली. परंतु वेळ वाहनांना जामनेर व वरणगाव हुन येण्यासाठी वेळ लागल्याने माळी यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले होते. ही घटना लक्षात घेऊन अग्निशमन वाहन लवकर आणा असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मुख्याधिकाऱ्यांकडे निवेदन देऊन मांगणी करण्यात आली.
मागील दोन वर्षांपूर्वी अग्निशमन वाहनाचे टी. एस. जानेवारी २०१९ मध्ये झालेले आहे. परंतु काही कारणास्तव अग्निशमन वाहन बोदवड नगरपंचायतीला उपलब्ध झालेली नसल्याने शहरातील नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे. शहरात सद्यस्थितीत एक घटना घडली त्यातून बोध घेऊन नगरपंचायतीतर्फे योग्य पाठपुरावा करून अग्निशमन वाहनाचा प्रस्ताव पुन्हा पाठवून लवकरात लवकर अग्निशमन वाहन तात्काळ उपलब्ध करून नागरिकांचे नुकसान होण्यापासून वाचवावे अश्या मांगणीचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे मुख्याधिकाऱ्यांना देण्यात आले.
त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते तथा नगरसेवक जफर शेख, उपगटनेत्या पूजा संदीप पारधी, नगरसेवक कडूसिंग पाटील, नगरसेविका एकता निंबाळकर, नगरसेविका योगिता खेवलकर, नगरसेविका सईदा बी सय्यद, नगरसेवक मुजमिल शाह व दीपक झांबड यांच्या निवेदनावर साह्य असून लतीफ शेख, संदीप पारधी सर, सय्यद हकीम बागवान उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत