पारशिवनी उपविभागात कोळशाच्या राखळीचा वापर करुण नहर बनविले जात आहे- संजय सत्येकार
सिंचन विभागाचा कारनामा टेकाडी, पारशिवनी उपविभागात कोळशाच्या राखळीचा वापर करुण नहर बनविले जात आहे- संजय सत्येकार
महा घडामोडी न्युज प्रतिनिधी सतीश भालेराव, नागपूर : पेंच पाठबंधारे विभागाच्या टेकाडी उपविभाग अंतर्गत येणाऱ्या बोर्डा रोड ते गहुहिवरा रोड पर्यंत फोर-वे ला लागून जाणाऱ्या कॅनल चे 7 किलोमीटर लाइनिंग सिमेंट कॉन्क्रीट चे काम चालू आहे. या कामात सिमेंट च्या ठिकाणी कोळशाच्या राखळी चा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे.
अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने ठेकेदार हे भ्रष्ट काम करत आहेत. दर वर्षी कॅनल चे वारंवार काम केले जाते आणि जनतेच्या टॅक्सच्या पैस्यांच्या चुराडा हे ठेकेदार आणि अधिकारी करतात. एकीकडे शेती व शेतकऱ्यांचे बेहाल झाले आहे आणि दूसरी कडे हे भ्रष्ट लोक सरकार च्या तिजोरीची लूटमार करत आहेत.
महाविदर्भ शेतकरी संघटनेचे संजय सत्येकार यांनी सरकार ला व या विभागचे मंत्री बच्चूभाऊ कडू यांना या प्रकरणात लक्ष देऊन या कामाची चौकशी करून ठेकेदार व अधिकाऱ्यांवर कडक कार्यवाही करण्याची मागणी केली आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत