Breaking News

श्री भैरवनाथ पतसंस्थेची निवडणूक बिनविरोध !

श्री भैरवनाथ पतसंस्थेची निवडणूक बिनविरोध !



शिवाजीराव आढळराव पाटील संस्थापक असलेल्या सहकार क्षेत्रातील अग्रगण्य श्री भैरवनाथ नागरी सहकारी पतसंस्था, लांडेवाडी- चिंचोडीच्या अध्यक्षपदी शिवाजीराव आढळराव पाटील  यांची तर उपाध्यक्षपदी सागर प्रकाश काजळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी श्रीकांत श्रीखंडे यांनी कामकाज पाहिले.


श्री भैरवनाथ नागरी सहकारी पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध पार पडली. पतसंस्थेच्या ११ जागा बिनविरोध निवडल्या गेल्या. त्यानंतर आज अध्यक्ष उपाध्यक्ष निवड प्रक्रिया पार पडली. यावेळी नवनिर्वाचित संचालक योगेश बाणखेले, महेश ढमढेरे, अभिमन्यू(आबा) लांडगे, राम तोडकर, कल्पनाताई आढळराव पाटील, शोभा आवटे, हनुमंत तागड, भिकाजी बोकड, अशोक गव्हाणे यांचा सत्कार करण्यात आला. पतसंस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी किसन भालेराव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रमेश खरमाळे, व्यवस्थापक संतोष पाचपुते, श्याम गावडे, अर्जुन आढळराव, अजित गवळी, राहुल बांगर, शशिकांत निसाळ, सुजाता काळे, राजेंद्र साळवी आदी उपस्थित होते.

>१११

श्री भैरवनाथ पतसंस्थेने ३५० कोटी रुपये ठेवींचा टप्पा पार केला आहे. २६० कोटी रुपयांचे कर्ज वाटप केले आहे. पतसंस्था नवीन शाखा विस्तार करत असून पंधरा शाखासह पतसंस्थेची वाटचाल वेगाने सुरू आहे. जुन्नर, राजगुरुनगर, चाकण, ठाणे या ठिकाणी नवी शाखांसाठी परवानगी मिळाली आहे. यावेळी पतसंस्थेचे उपाध्यक्ष सागर काजळे यांनी आभार मानले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत