Breaking News

दारुची अवैध वाहतुक करणाऱ्यांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने आवळल्या मुसक्या

दारुची अवैध वाहतुक करणाऱ्यांवर पोलीस स्टेशन देवळी येथील गुन्हे प्रकटीकरण पथकाची दारुबंदी कायद्यान्वये कार्यवाही एकुण ४,४२,६००/- रु. चा देशी-विदेशी दारूसाठा जप्त


महा घडामोडी न्युज नेटवर्क,वर्धा : दिनांक ११-०४-२०२२ रोजी दारुबंदी असलेल्या वर्धा जिल्यातील देवळी तालुक्यात देशी-विदेशी दारू अवैधरित्या चारचाकी वाहनाने येत असल्याबाबत मुखबिरकडुन खात्रीशीर माहिती मिळाल्याने देवळी येथील यशोदा नदीचे यवतमाळ देवळी हायवे पुलावर सापळा रचुन नाकेबंदी केली असता मिळालेल्या माहिती प्रमाणे एक मारुती सुझुकी कंपनीचे स्विफ्ट वाहन येत असल्याचे दिसुन आल्याने सदर वाहन चालकास थांबविण्याचा इशारा केला असता त्याने वाहन थांबविले. सदर वाहनामध्ये १) ७ खडर्याचे खोक्यात देशी दारुच्या १८० एमएलच्या सिलबंद ३३६ निपा प्रती निप किंमत १००/- रु. प्रमाणे एकूण किंमत ३३,६००/- रु. २) ३ खर्डयाचे खोक्यात हेवर्ड्स- ५००० कंपनीच्या ६५० एमएलच्या ३६ बियरच्या शिश्या प्रती शिशी २५०/- रु. प्रमाणे ९०००/- रु. ३) एक पांढऱ्या रंगाचे सुझुकी कंपनीचे स्विफ्ट वाहन क्रमांक एमएच-३२/सी-६९८५ किंमत ४,००,०००/- रु. असा एकुण ४,४२,६००/ रु. चा माल जप्त करून आरोपी चालक १) कुणाल नरेंद्र तायवाडे, वय २७ वर्ष, रा. ब्राम्हणपुरा वार्ड क्र. ९, देवळी, २) संजय भुतूजी तेलकर, वय २१ वर्ष, रा. देशमुखपुरा, वार्ड क्र. १७ देवळी यांचे विरुध्द दारुबंदी कायद्यान्वये कार्यवाही करण्यात आली.

सदर कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक श्री प्रशांत होळकर, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री यशवंत सोळंके, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी, पुलगाव श्री गोकुळसिंग पाटील यांचे मार्गदर्शनात परि. पोलीस अधीक्षक शफकत आमना यांचे निर्देशाप्रमाणे गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस अंमलदार कुणाल हिवसे, उमेश गेडाम, अनिल तिवारी, दयाल धवणे, सर्व नेमणुक पोलीस स्टेशन देवळी यांनी केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत