शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नासाठी शिक्षक समितीचे पंचायत समिती अर्जूनी मोरगाव समोर ठिय्या आंदोलन
शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नासाठी शिक्षक समितीचे पंचायत समिती अर्जूनी मोरगाव समोर ठिय्या आंदोलन
जिल्हाध्यक्ष किशोर डोंगरवार यांच्या नेतृत्वात शिक्षक एकतेची वज्रमूठ
गटशिक्षणाधिकारी यांच्या लेखी पत्राने आंदोलनाची समाप्ती
महा घडामोडी न्युज जिल्हा प्रतिनिधी, संतोष रोकडे,गोंदिया : अर्जुनी मोरगाव तालुक्यात कार्यरत जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांना मागील अनेक वर्षापासून विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे त्याकरिता शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष किशोर डोंगरवार यांच्या नेतृत्वात आज पंचायत समिती कार्यालयासमोर भव्य ठिय्या आंदोलन आयोजित करण्यात आले होते.
यामध्ये प्रामुख्याने 1)माहे फेब्रुवारीच्या वेतनापासून एकमेव अर्जुनी मोरगाव तालुका वंचित, २) माहे फेब्रुवारी 2022 च्या प्रलंबित वेतनामुळे आयकर भरणे करिता अतिरिक्त शुल्क /दंड मोजावे लागणार,३) 2019 पासून रखडलेला 7व्या वेतन आयोगाच्या थकबाकीचा पहिला हप्ता जीपीएफला अद्याप पर्यंत पाठवण्यात आलेला नाही तसेच 2021 पासून प्रलंबित जीपीएफ चा दुसरा हप्ता देखील पाठवण्याबद्दल कोणतीच कार्यवाही सुरू नाही,४)दरमहा पगारातून कपात होणाऱ्या GPF रक्कम विवरणपत्र (शेडूल )एप्रिल 2020 पासून आजपर्यंत जि.प.ला पाठवण्यात आलेले नाहीत,५)मा. मुख्य कार्यकारी अधिकारी गोंदिया यांचे आदेशान्वये मार्चचे वेतन एकस्तरनुसार काढणे बाबतची कार्यवाही पूर्ण झालेले नाही,६)BLO करीता नियुक्त प्राथ. शिक्षकांना वगळणेबाबतचा प्रस्ताव पंचायत समितीकडून SDO कार्यालयाला अद्याप पर्यंत पाठवण्यात आलेला नाही.७) सेवापुस्तकातील नोंदी मागील तीन वर्षापासून अद्यावत केलेल्या नाहीत, यासह इतरही अनेक प्रश्नांचा यामध्ये समावेश आहे
यावेळी गटविकास अधिकारी विलास निमजे व गटशिक्षणाधिकारी आर. एल. मांढरे यांचे समोर शिक्षकांनी आपल्या समस्येचा पाढा वाचला या संपूर्ण समस्याचे दिनांक 22/04/2022 पर्यंत निराकरण करण्याचे लेखी पत्र गटशिक्षणाधिकारी यांनी संघटनेला दिले आहे लेखी आश्वासनानंतर शिक्षक समितीने हे आंदोलन तात्पुरते मागे घेतले आहे, यावेळी तालुक्यातील सुमारे 300 शिक्षक-शिक्षिका उपस्थित होते.
या आंदोलनाचे प्रस्ताविक संघटनेचे जिल्हा प्रसिद्धीप्रमुख कैलास हांडगे यांनी केले संचालन तालुका सचिव श्रीकृष्ण कहालकर व आभार तालुका कार्याध्यक्ष दिलीप लोधी यांनी मानले



कोणत्याही टिप्पण्या नाहीत