माता महाकाली मंदिरात भाविकांसाठी आरोग्य सेवा
माता महाकाली मंदिरात भाविकांसाठी आरोग्य सेवा
महा घडामोडी न्युज नेटवर्क चंद्रपूर : श्री सत्य साईसेवा संघटना महाराष्ट्र जिल्हा - चंद्रपुर अंतर्गत मोबाईल मेडिकेअर प्रोजेक्ट (महाराष्ट्र आणि गोवा) नुसार चंद्रपुर जिल्ह्यातील खेडेगावात निःशुल्क आरोग्य तपासणी व मोफत औशधोपचार सेवा जवळपास पंधरा वर्षे पासून सुरू आहे .तसेच चंद्रपुर येथील माता महाकाली मंदिरात दरवर्षी चैत्र महिण्यात गुडीपाडव्यापासून ते चैत्र पौर्णिमेपर्यंत यात्रा भरत असते . या यात्रेत येणाऱ्या भाविकांसाठी व त्यांच्या आरोग्यासाठी श्री सत्य साई सेवा संघटना चंद्रपुर तर्फे निःशुल्क आरोग्य तपासणी व मोफत औशधोपचार जवळपास 15 वर्षांपासून मंदिरात वैद्यकीय केंद्र उभारून सकाळी 06 ते सायंकाळी 08 वाजेपर्यंत ही सेवा केली जाते. या वर्षी सुद्धा ही सेवा 11 एप्रिल 2022 ते 21 एप्रिल 2022 पर्यंत देण्यात येत आहे .ही सेवा देण्याकरिता मोबाइल मेडिकेअर प्रोजेक्ट इंचार्ज श्री बबन तितरमारे ,श्री वसंतराव मैलारपवार ,सेवादल व डॉ. वसंतराव निलावार ,डॉ.रामचंद्र बरडे ,डॉ. जयाताई कोतपल्लीवार ,डॉ. कौशल्या अडवाणी, डॉ .कमलेश वैरागडे डॉ. हिमांशू गंधेवार डॉ. अनिल कुकडपवार अतिशय उत्साहाने सतत नियमित सेवा देत असतात .असे श्री सत्यसाई सेवा संघटना ,महाराष्ट्र जिल्हा - चंद्रपुर जिल्हाध्यक्ष श्री चंद्रशेखर मुनगंटीवार कळवितात.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत