Breaking News

सभापती काशिनाथ दाते तालुक्याच्या अपंगांचे कैवारी : संपर्कप्रमुख अरुण वाकचौरे

सभापती काशिनाथ दाते तालुक्याच्या अपंगांचे कैवारी : संपर्कप्रमुख अरुण वाकचौरे


महा घडामोडी न्यूज नेटवर्क,अहमदनगर : पारनेर तालुक्याला जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सन २०२१-२२ च्या आर्थिक वर्षात दिव्यांगाना वैयक्तिक लाभाच्या योजनेतून सर्वात जास्त निधी सभापती काशिनाथ दाते सर यांनी मिळवून दिल्याबद्दल प्रहार दिव्यांग संघटना यांच्या वतीने सभापती दाते यांचा सत्कार करण्यात आला यावेळी संपर्कप्रमुख अरुण वाकचौरे बोलत होते वाकचौरे म्हणाले गेल्या पाच वर्षांच्या काळात पारनेर तालुक्याला जिल्हा परिषदेच्या माध्यमातून दिव्यांग कल्याण निधी योजनेअंतर्गत वैयक्तिक लाभाचा सर्वात जास्त निधी दाते सरांच्या माध्यमातून जवळपास पन्नास लक्ष रुपयांचा निधी तालुक्‍यासाठी आला आहे त्याबद्दल सरांचे आभार मानावे तेवढे कमीच आहे तालुक्यात कोणताही दिव्यांग योजनेपासून वंचित राहणार नाही, तसेच भविष्यात अपंगांचे प्रश्न मार्गी लावले जातील, कोणतीही अडचण दिव्यांगांना येणार नाही अशी ग्वाही सभापती दाते यांनी आम्हास दिल्याचे वाकचौरे यांनी सांगितले

यावेळी वाकचौरे म्हणाले दिव्यांगांचे वैयक्तिक लाभाचे जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये तालुक्यातून प्रकरणे दिली जातात जेव्हा दिव्यांगांसाठी योजना जिल्हा परिषद जाहीर करते तेव्हा तेव्हा सरांनी आम्हाला स्वतः फोन करून योजनांबाबत माहिती दिली त्यानुसार आम्ही जास्तीत जास्त प्रस्ताव पंचायत समितीला सादर केले होते ते सर्व प्रस्ताव जवळपास दाते सरांच्या माध्यमातून मंजूर झालेले आहेत सभापती दाते यांनी तालुक्याचा विकास करत असताना जिल्हा परिषदेच्या वैयक्तिक लाभाच्या योजना ही समाजाच्या तळागाळापर्यंत, आर्थिक दृष्ट्या मागास असलेल्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचे चांगले काम केलेले असून माझ्या माहितीप्रमाणे त्यांच्या जिल्हा परिषदेच्या कालावधी मध्ये जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकणार्‍या परंतु आर्थिक दृष्ट्या मागास असणाऱ्या जवळपास चारशे मुला-मुलींना सायकल देण्याचे काम त्यांनी केलेले आहे त्यामुळे आम्ही काही तरी देणे लागतो या माध्यमातून प्रहार दिव्यांग संघटनेच्यावतीने आम्ही सभापती दाते सर यांचा सत्कार केलेला आहे यावेळी उद्योजक दिलिप दाते, संपर्क प्रमुख अरुण वाकचौरे, अध्यक्ष अरविंद नरसाळे, उपाध्यक्ष नारायण काने, सचिव उमेश पवार, सहसचिव सागर सातपुते, विश्वास माने, फिरोज तलवी इत्यादी दिव्यांग संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत