विसापूर पुरपूडी भागातील नालीचे बांध काम 3 ते 4 दिवसात ई-टेंडर होणार
संदीप पोडे यांनी विसापूर ग्रामपंचायतला दिलेल्या निवेदनाचा घेतला आढावा
विसापूर पुरपूडी भागातील नालीचे बांधकाम 3 ते 4 दिवसात होणार ई-टेंडर
महा घडामोडी न्यूज तालुका प्रतिनिधी,बल्लारपूर : विसापूर ग्रामपंचायतने खोदून ठेवलेल्या नाल्यांमुळे नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागत आहे,तरी हा त्रास बघत संदीप पोडे भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष यांनी विसापूर ग्रामपंचायतकडे मागणी केली होती.
आपल्याला माहीत आहे आपल्या विसापूर ग्रामपंचायत तर्फे पुरपूडी येथील नाली ग्रामपंचायत काही वर्षा आधी बांधकाम केल ग्रामपंचायतचे जवळपास 3 लक्ष रुपये नालीसाठी लावण्यात आले. तेव्हा त्या नालीची लेव्हल बघून काम केले असता आज हि परिस्थिती आली नसती. आज अजून आपण जवळपास एक -दीड लक्ष रुपये नागरिकांचे (ग्रामपंचायत) चे पैसे खर्च करून नाली खोदकाम केल त्या नालीचा खोदकामची रेती रस्तावरच पडलेली आहे. त्या मुळे नागरिकांना त्रास होत असल्याचे दृश पाहायला मिळत आहे.
ग्रामपंचायतने हि बाब गंभीरतेने घेऊन लक्ष देत हि नाली बांधकाम लेव्हल बघून अजून नागरिकांचा पैसा वाया जाणार नाही सर्व बघून अजून बांधकाम करण्याची वेळ येऊ नये ,या पद्धतीने ते नालीचे बांधकाम पूर्ण करावे हि विनंती. या प्रकारचा निवेदनातून संदीप पोडे यांनी विसापूर ग्रामपंचायतकडे मागणी केलेली आहे. त्या मातीमुळे अनेक ऍक्सेडंट सुद्धा झालेले आहे तरी विसापूर ग्रामपंचायत चे लक्ष नाही. संदीप पोड (भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष) यांनी विसापूर ग्रामपंचायतकडे मागणी केलेली होती आज आढावा घेतला असता नालीचे काम 3 दिवसाचा आत टेंडरी मग होऊन जाईल याची माहिती मिळाली.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत