Breaking News

महावितरण च्या उपअभियंत्याचे स्थानांतरण करा अन्यत: हल्लाबोल

 महावितरण च्या उपअभियंत्याचे स्थानांतरण करा अन्यत: हल्लाबोल

महावितरण चे अधीक्षक अभियंत्यास रिपब्लिकन सेनेचे निवेदन

महा घडामोडी न्युज विशेष प्रतिनिधी,कालिदास खोब्रागडे, भंडारा : लाखनी येथील वीज वितरण कंपनी चे उपअभियंता राजन लिमजे यांचे ३ दिवसांत स्थानांतरण करा. अन्यत: १६ जून रोज गुरुवार ला दुपारी १२:०० वाजता उपविभागीय कार्यालय लाखनी येथे हल्लाबोल आंदोलन करण्याचा अधिक्षक अभियंता महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी विद्युत भवन भंडारा यांना संयुक्त लोकशाही आघाडी समर्थित रिपब्लिकन सेनेद्वारे निवेदनामार्फत इशारा दिला आहे.  

उपअभियंता राजन लीमजे यांच्या भ्रष्ट कारभाराविषयी तसेच ग्रामीण भागातील वीज ग्राहकांना त्रास देण्याबाबद २७ मे २०२२ रोजी पत्राद्वारे आपणास सूचना देण्यात आली होती. पण आपणाकडून दखल घेतली गेली नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील वीज ग्राहकांचे हित संबंध किंवा समस्येबाबद आपणाकडून कोणतीच कार्यवाही केली गेली नाही. असे निवेदनात नमूद आहे. उपअभियंता राजन लिमजे मोठे वीज ग्राहक, व्यवसायिक, उद्योग, वीज चोरी करीत असताना सुद्धा त्यांचेवर चिरीमिरी घेऊन कुठल्याही प्रकारची कार्यवाही करीत नाही. तर ग्रामीण भागातील ग्राहकांना त्रास देत आहेत. 

त्यांचे विरुद्ध आपणास कळवून सुद्धा कोणतीही कारवाई केली गेली नाही. असे अधीक्षक अभियंता यांना दिलेल्या निवेदनात नमूद आहेत. कारवाई न केल्यामुळे अशा भ्रष्ट अधिकाऱ्याच्या विरोधात १६ जून रोजी उपविभागीय कार्यालय लाखनी येथे हल्लाबोल आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. संयुक्त लोकशाही आघाडी समर्थित रिपब्लिकन सेनेचे अचल मेश्राम, शशिकांत भोयर. जनकल्याण निवारण समितीचे अध्यक्ष दिनेश वासनिक, नाशिक चौरे, मानवाधिकार आयोग अध्यक्ष देवानंद नंदागवळी, 

जीवन आधार फाउंडेशन महाराष्ट्र चे महासचिव संजिय भांबोरे, वंचित आघाडीचे दीपक जनबंधू, रिपब्लिकन नेता भजनदास मेश्राम, सम्राट अशोक सेनेचे संजय लूटे, रामलाल मांढरे, भीमराव नागदेव, गुलाब धांडे, शेषराव पंधरे, मधुकर कावळे, अजय ढेंगे, प्रवेश खोब्रागडे, जयपाल दिघोरे, भगवान ढेंगे, राजेश सार्वे यांचे मार्फत दिला असून ऊर्जामंत्री नितीन राऊत, पालकमंत्री विश्वजित कदम, जिल्हाधिकारी भंडारा, पोलिस अधीक्षक भंडारा, कार्यकारी अभियंता वीज वितरण कंपनी साकोली, उपविभागीय अभियंता वीज वितरण उपविभाग लाखनी, उपविभागीय अधिकारी साकोली, तहसीलदार लाखनी तथा पोलिस निरीक्षक लाखनी यांना प्रतीलिपी देण्यात आल्या आहेत.






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत