Breaking News

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे शुक्रवारी परभणी जिल्हा दौऱ्यावर

 राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे शुक्रवारी परभणी जिल्हा दौऱ्यावर


महा घडामोडी न्युज तालुका प्रतिनिधी,सूरज शहाणे, परभणी : राष्ट्रवादी काँग्रेस च्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे ह्या शुक्रवारी दि 27 में 2022 रोजी परभणी जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत.सकाळी 10:30 वाजता शिवाजी महाविद्यालयात आयोजित श्रवण यंत्र व दिव्यांग साहित्य वितरण कार्यक्रमास उपस्थितीत राहणार आहेत. त्यानंतर दुपारी 12वाजता क्वीन्स इंग्लिश स्कुल नांदखेडा रोड येथे यशवंत राव चव्हाण सेंटर व यशस्वीनि सामाजिक अभियान बैठक होणार आहे.

दुपारी 1:30 वाजता प्रताप देशमुख यांच्या निवास्थानी भेट देणार आहेत.दुपारी 2:30 वाजता राष्ट्रवादी भवनात त्या पत्रकराशी संवाद साधतील.दुपारी 4वाजता पोखर्णी येथे जाऊन श्री नरसिंह मंदिरात दर्शन घेणार आहेत. सायंकाळी 5:30वाजता सोनपेठ येथे राजेश विटेकर यांच्या निवास्थानी भेट देणार आहेत त्यानंतर सायंकाळी 6वाजता लातूरकडे त्या प्रयाण करतील.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत