जिल्ह्याचे वनविभाग प्रशासन कोमात , वाघाची दहशत मात्र संपूर्ण जिल्ह्यात जोमात
जिल्ह्याचे वनविभाग प्रशासन कोमात , वाघाची दहशत मात्र संपूर्ण जिल्ह्यात जोमात
तेंदूपत्ता संकलनाला गेलेला वृद्धाचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू
महा घडामोडी न्यूज नेटवर्क चंद्रपूर : ब्रम्हपुरी वन विभाग ब्रह्मपुरी अंतर्गत, नागभीड वनपरिक्षेत्रात येणाऱ्या कोसंबी - गवळी बिटातील कक्ष क्रमांक ७४२ मध्ये तेंदुपत्ता संकलना करिता गेलेला नवेगाव हुंडेश्वरी येथील आडकू गेडाम (६५) याला वाघाने ठार मारल्याची घटना आज घडली.
याबाबतची माहिती मिळताच वनरक्षक के पाटील यांनी घटनास्थळी भेट घेऊन शवविच्छेदनाचा करता ग्रामीण रुग्णालय येथे पाठविले.
त्यानंतर पिडीत परिवाराला वन विभागामार्फत तात्काळ आर्थिक मदत करण्यात आली. घटनास्थळी कॅमेरे लावून वाघाच्या हालचालीवर नजर ठेवण्यात येत असून वन विभागाने त्या परिसरात गस्त सुरू केलेली आहे.
सिंदेवाही वनपरीक्षेत्र अंतर्गत उपवनपरीक्षेत्र नवरगाव अंतर्गत येत असलेल्या रत्नापुर बीट आहे. सदर रत्नापुर गावासभोवताल कोणताही जंगल परीसर नसुन सर्वत्र शेत शिवार परीसर आहे. तरीपण या परीसरातुन वार्ड क्र ५ असलेल्या शांताराम कारमेंगे रत्नापुर येथे पहाटेच्या सुमारास थेट गोठयात शिरून बिबट्याने गोरीवर हल्ला केला
. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. सविस्तर वृत्त असे की, नवरगांव शहरापासून २ किमी अंतरावर असलेल्या रत्नापुर येथे शांताराम कारमेंगे यांचे वार्ड नं ५ येथे गोठा आहे.
शांताराम कारमेंगे हे शेतकारी असून यांच्याकडे स्वमालकीच्या गायी गोरी आहेत. नेहमीप्रमाणे कारमेंगे यांनी आपल्या गुरांना झोपण्याआधी गोठयात बांधले व झोपायला निघुन गेले. पहाटे अंदाजे ३ ते ४ वाजेच्या सुमारास बिबट्या ने गोरीवर हल्ला केला. आणि त्यामधे बिबट्याने ठार केले. सुदैवाने यात कोणतीही जीवीतहानी झाली नाही. या आधी अनेकदा बिबट्याने थेट गावात शिरून कित्येकांच्या घरचे गायी, शेळ्या, बकराचा सुद्धा जीव घेतला आहे. घटनास्थळी वनक्षक जितेंद्र वैद्य रत्नापुर, यांनी दाखल होवुन पंचनामा केला. जंगल परीसर सोडुन गावात वन्यप्राण्यांचा वावर वाढत असल्याचे चित्र या घटने दिसून येते आहे. त्यामुळे मानव व जंगली प्राणी यांचा सघर्ष होवुन जिवित हाणी होवु शकते. तरी वनविभागाने बिबट्याचा योग्य बंदोबस्त करुन गावाला भयमुक्त करावे, अशी मागणी गावकर्यांकडून केली जाता आहे



कोणत्याही टिप्पण्या नाहीत