Breaking News

शहरात मोकाट जनावरांची संख्या मोठ्या प्रमाणात

चंद्रपूर शहरात दररोज सरासरी ४ ते ५ मोकाट जनावरांचा मृत्यू


महा घडामोडी न्यूज नेटवर्क चंद्रपूर ;  शहरात मोकाट जनावरांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. काही जनावरांचे मालक त्रास वाचविण्यासाठी त्यांना मोकाट सोडत आहे. परिणामी, रस्ते अपघातात या निष्पाप जनावरांचा जीव जात आहे. चंद्रपूर शहरात दररोज सरासरी ४ ते ५ मोकाट जनावरांचा मृत्यू होत असल्याचे मत प्यार फाउंडेशनने व्यक्त केले आहे. यांसदर्भात त्यांनी जनजागृती मोहीम सुरू केली आहे.


मोकाट जनावरांचे संरक्षण करणाऱ्या प्यार फाउंडेशनकडे दररोज अपघाताची माहिती मिळत असून, त्यांना जमेल त्या पद्धतीने संस्थेचे सदस्य मदत करण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र, प्रत्येक घटनेमध्ये जनावरांना वाचविणे शक्यच होत नसल्याने त्यांचाही नाईलाज होत आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी हे अपघात होत आहे. त्यामुळे महापालिकेने विशेष मोहीम राबवून जनावरांच्या शिंगांना रिप्लेक्टर लावणे तसेच मोकाट जनावरांचा बंदोबस्त करणे आवश्यक आहे. काही वेळा या अपघातांत जनावरांचा जीव जातो, नाही तर दुचाकीसह अन्य वाहनधारकांनाही दुखापत होते.


मागील काही दिवसामध्ये मोठ्या प्रमाणात वाहनांची संख्या वाढली आहे. त्या तुलनेत रस्ते अगदीच अरुंद आहे. त्यातच मोकाट जनावरांमुळे अनेकवेळा नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत