Breaking News

सट्टेबाजी प्रकरणातील आरोपींना दोन दिवसाची पोलीस कोठडी

 

सट्टेबाजी प्रकरणातील आरोपींना दोन दिवसाची पोलीस कोठडी


महा घडामोडी न्यूज नेटवर्क,चंद्रपूर : घुग्घुस शहरात शुक्रवारचा रात्री दहा वाजताचा सुमारास येथील लॉयड मेटल कंपनीच्या गेटजवळील एका घरात गेल्या दोन महिन्यांपासून खुलेआम आयपीएल सट्टेबाजी सुरू होती. गोपनीय माहीतीचा आधारावर अतिरिक्त पोलीस अधीक्षक कुलकर्णी आणि एसडीपीओ आयुष नोपनी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने छापा टाकला. या धाडसत्रात घटनास्थळी सहा बुकींना पकडण्यात आले. पकडण्यात आलेल्या आरोपींना आज न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने आरोपींना दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

घुग्घुस येथील केमिकल वॉर्ड क्र. सहा येथे भ्रमनध्वनी वरून आयपीएल सट्टा घेत असल्याची गोपनीय माहिती वरोरा येथील पोलिसांना दिली असता वरोरा पोलिसांनी पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली केमिकल वॉर्ड 6 येथिल रोहित पृथ्वीराज घोरपडे यांचे घरी रात्री 10 वाजताच्या दरम्यान धाड टाकून 

आरोपी जमीर खान उर्फ जम्मू मेहबूब (38) वर्ष, मोहंमद शेफ शब्बीर चिनी (25) वर्ष, निलेश अरोरा (46) वर्ष, मनीष डफ (44) वर्ष, मोहमद आसिम मोहंमद अनिस (19) वर्ष, एजाज अल्ली ताहेर अल्ली (4) वर्ष सर्व रा. वणी जि. यवतमाळ व रोहित घोरपडे (26) वर्ष रा. घुग्घूस या आरोपीना 1 लाख 20 हजाराच्या मुद्देमाला सह कलम 420, 465, 468, 471 (34) महाराष्ट्र जुगार कायदा 4, 5 अन्वये घुग्घूस पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करून आरोपीना अटक केली. 

आज आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने आरोपींना दोन दिवसाची पोलीस कोठडी सूनावली आहे. दरम्यान पोलीसांचा तपासावर आता प्रश्न उपस्थित केले जात आहेत. कार्यवाहीचा दिवशी पोलीसांनी घरमालकाला ताब्यात घेतले होते. मात्र आज न्यायालयात हजर करताना मुलाला हजर केले. विशेष म्हणजे कार्यवाहीचा दिवशी ताब्यात घेतलेली वाहने सोडून देण्यात आली

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत