Breaking News

रावेर येथे विश्वशांतिदुत भगवान गौतम बुद्ध यांची जयंती उत्साहात साजरी

 रावेर येथे विश्वशांतिदुत भगवान गौतम बुद्ध यांची जयंती उत्साहात साजरी  


महा घडामोडी न्यूज  प्रतिनिधी दिपक तायडे,रावेर : रावेर येथिल तक्षशिला बुद्ध विहारात विश्वशांतिदुत भगवान गौतम बुद्ध यांची 2566 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली प्रथम बुद्ध मूर्तीची पुष्पपूजा, दिपपूजा व धुपपूज करण्यात आली यानंतर भारतीय बौद्ध महासभेचे शहराध्यक्ष दिपक तायडे सर यांनी उपस्थित समाज बांधवांना सामूहिक त्रिशरण पंचशील दिले. 

यावेळी कामगार नेते दिलीप कांबळे, माजी नगरसेवक ऍड.योगेश गजरे, जगदीश घेटे, वंचीत बहुजन आघाडी तालुकाध्यक्ष बाळू शिरतुरे यांनी मनोगत व्यक्त करून भगवान बुद्ध यांच्या विचारांचे आचरण करावे असे आवाहन केले.याप्रसंगी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष पंकज वाघ, उपअधीक्षक भूमिअभिलेख राजू घेटे, आदिवासी विकास अधीक्षक विशाल गजरे, बौद्धाचार्य राजेंद्र अटकाळे, सामाजिक कार्यकर्ते डी. डी. वाणी,माजी नगरसेविका रंजना गजरे,पुंडलिक कोंघे, किरण तायडे, रघुनाथ कोंघे,संघरक्षक तायडे, सावन मेढे, निलेश तायडे,माया तायडे, निर्मला तायडे, वर्षा इंगळे, शोभा हिवरे, उषा गजरे, सम्येक इंगळे,विकास वाघ, सुरेश घेटे,अटकाळे कंडक्टर यांचेसह असंख्य समाज बांधव उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन भारतीय बौध्द महासभेचे शहराध्यक्ष दिपक तायडे सर यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत