Breaking News

सावली तालुक्यात केंद्रिय मंत्र्याकडे नव्या राष्ट्रीयकृत बँकाच्या शाखा उघडण्याची मागणी

 सावली तालुक्यात केंद्रिय मंत्र्याकडे नव्या राष्ट्रीयकृत बँकाच्या शाखा उघडण्याची मागणी

महा घडामोडी न्युज प्रतिनिधी, सावली : भारत सरकारचे अर्थ राज्य मंत्री मा.ना.डॉ. श्री भागवत कराड आणि माजी मंत्री लोकलेखा समिती प्रमुख तथा आम. मा. सुधिर भाऊ मुनगंटीवार चंद्रपूर येथे भाजपा तालुका अध्यक्ष सावली तथा भाजपा ओबीसी मोर्चा जिल्हा अध्यक्ष अविनाश पाल यांनी भेट घेऊन सावली तालुक्यातील राष्ट्रीयकृत बँकाची नवीन शाखा उघडण्यासाठी निवेदन देण्यात आले.

 सावली तालुक्यातील राष्ट्रीयकृत बँका शाखा फार कमी प्रमाणात आहे केंद्र सरकारच्या व राज्य सरकारच्या विविध प्रकारच्या योजनाचे लाभ हे राष्ट्रीयकृत बँका मार्फत शासन राबवित असतात यामुळे तालुक्यातील जनतेला विविध प्रकारच्या योजनाचे आर्थिक लाभ उचण्याकरिता कोसो दूर जाऊन लाईन मध्ये राहून सुधा काम न होता उलट पावली परत येत असतात,

 असे एकदाच नाही तर अनेक वेळा हेलपाटे मारावे लागतात तालुक्याची लोकसंख्या 1लाख आहे तालुक्यात सध्या रास्ट्रिकृत बँका 4 चारच आहेत लोकसंख्येच्या प्रमाणात तालुक्यात 10 ते 12 नवीन बँकाच्या शाखा ची अत्यंत गरज आहे या तालुक्यातील जनतेचा त्रास लक्षात घेऊन भाजपा तालुका अध्यक्ष अविनाश पाल यांनी केंद्रीय राज्य अर्थ मंत्री डॉ. कराड यांच्याकडे निवेदाद्वारे तालुक्यात बँकांची नविन शखा वाढीविण्याची मागणी केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत