Breaking News

अट्टल दुचाकीचोर गुन्हे प्रकटीकरण पथकाचे जाळ्यात

 अट्टल दुचाकीचोर पोलीस स्टेशन वर्धा शहर येथील गुन्हे प्रकटीकरण पथकाचे जाळ्यात

महा घडामोडी न्यूज नेटवर्क,वर्धा : फिर्यादी नामे सौ. रजनी प्रशांत गजभिये , रा. सिंधी मेघे, वर्धा ह्या दिनांक १४.०४.२०२२ रोजी रात्री २१.१५ वाजताचे दरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती रॅली पाहण्याकरीता गेल्या असता रॅलीमध्ये गर्दी जास्त असल्याकारणाने फिर्यादी यांनी त्यांचे मालकीची एक जुनी वापरती पांढ या रंगाची हिरो कंपनीची मेस्ट्रो मोपेड दुचाकी क्रमांक एमएच-१५/एफएच-३९६१ ही तकलीवाला वर्क शॉप, महादेवपुरा, वर्धा येथे उभी करून रॅली पाहण्याकरीता गेल्या व रॅली पाहुन रात्री २३.३० वाजता परत आल्या असता त्यांचे मोपेड वाहन ठेवलेल्या ठिकाणी मिळुन आले नाही. सदर वाहनाचा आजुबाजुला शोध घेतला असता मिळुन न आल्याने फिर्यादीचे रिपोर्टवरुन पो.स्टे. वर्धा शहर येथे अप.क्र.५८८/२०२२ कलम ३७९ भा.द.वि.अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.

सदर गुन्हयाचे तपासात गुप्त बातमीदाराकडुन मिळालेल्या खात्रीशीर माहितीचे आधारे आरोपी नामे समीर सलीम खॉन, वय २३ वर्ष, रा. इतवारा बजार, ता.जि.वर्धा यास ताब्यात घेवुन त्यास गुन्ह्यासंबंधाने विचारपुस केली असता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिल्याने त्याचे ताब्यातुन गुन्ह्यातील चोरीस गेलेली एक जुनी वापरती पांढऱ्या रंगाची हिरो कंपनीची मेस्ट्रो मोपेड गाडी क्रमांक एमएच-१५/एफएच-३९६१, कि.२०,००० रू ची मोपेड गाडी हस्तगत करुन वर नमूद गुन्हा उघडकीस आणला.

सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री प्रशांत होळकर, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री यशवंत सोळंके, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी, वर्धा श्री पियु ष जगताप याचे मार्गदर्श नात पोलीस निरीक्षक श्री सत्यवीर बंडीवार पो.स्टे. वर्धा (शहर) यांचे निर्देशाप्रमाणे पोलीस अंमलदार सुभाष गावड, नितीन रायलकर, दिवाकर परीमल, राधाकिसन घुगे, पवन निलेकर, राजेन्द्र ढगे, राहुल भोयर व राजु तांबारे सर्व नेमणुक पो.स्टे. वर्धा (शहर) यांनी केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत