वडेगाव रेल्वे येथील सेवा सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदावर चौथ्यांदा सुभाष खुणे यांची बिनविरोध निवड
वडेगाव रेल्वे येथील सेवा सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदावर चौथ्यांदा सुभाष खुणे यांची बिनविरोध निवड
महा घडामोडी न्यूज जिल्हा प्रतिनिधी, संतोष रोकडे,गोंदिया : अर्जुनी-मोर तालुक्यातील वडेगाव रेल्वे येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेची अध्यक्ष उपाध्यक्ष व व्यवस्थापक मंडळाची निवडणूक प्रक्रिया दिनांक 11 मे रोजी पार पडली अध्यक्ष म्हणून सुभाष ऋषी खुणे यांची सलग चौथ्यांदा अध्यक्ष पदावर बिनविरोध निवड झाली तर उपाध्यक्ष म्हणून मुकुंदा थोटू खूणे त्यांची सुद्धा बिनविरोध निवड करण्यात आली.
नवनिर्वाचित सदस्य गण म्हणून आनंदराव रघुनाथ सोनवणे श्रीराम मा धोराव खुणे शालिकराम गणा भोयर राहुल रामचंद्र रामटेके धनराज कवडु खुने सुरज कुमार सिताराम पवार मोहन रघुनाथ खूणे दयाराम किसन सयाम बंडू देवाजी वालदे गीता यादोराव खूणे मंदा दिलीप खूणे यांची निवड करण्यात आली विशेष म्हणजे या संस्थेची निवडणूक प्रक्रिया बिनविरोध पार पडली अध्यासी अधिकारी तथा निवडणूक अधिकारी म्हणून येडी मेश्राम यांनी काम पाहिले नवनियुक्त अध्यक्ष उपाध्यक्ष व सदस्य यांचे अभिनंदन शेतकऱ्यांकडून केले जात आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत