अर्जुनी येथे विविध विकास कामांचे नगराध्यक्षांच्या हस्ते भूमिपूजन
अर्जुनी येथे विविध विकास कामांचे नगराध्यक्षांच्या हस्ते भूमिपूजन
महा घडामोडी न्यूज जिल्हा प्रतिनिधी,संतोष रोकडे,गोंदिया ; अर्जुनी नगरपंचायत अंतर्गत प्रभागांमध्ये विविध विकास कामांचे भूमिपूजन नगराध्यक्षा मंजुषा बारसागडे यांच्या हस्ते करण्यात आले.शहरामध्ये उन्हाळ्यात काही प्रभागांमध्ये पाणीटंचाई भासत असते. या पाणी त्यांच्यावर मात करण्यासाठी प्रभाग 8 सहा बारा सोळा सतरा मध्ये नगरोत्थान आणि पाणीपुरवठा योजनेअंतर्गत नवीन नळ जोडणी च्या विकास कामाचे भूमिपूजन करण्यात आले.
प्रभाग 11 मध्ये रेल्वे स्थानकाच्या मागे यामुळे परिसरातील नागरिकांना धोका संभवतो. यावर उपाय म्हणून सोस खड्डा तयार करण्यात आला. यावेळी बांधकाम सभापती संजय पवार, स्वच्छता व पाणीपुरवठा सभापती दानेश साखरे ,नगरसेवक सागर आरेकर, कर्मचारी सुरेश बोरीकर ,कंत्राटदार प्रकाश उईके आणि कर्मचारी उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत