नांदगावच्या ग्राम रोजगार सेवकांना कामावरून कमी करण्याचे आदेश
नांदगावच्या ग्राम रोजगार सेवकांना कामावरून कमी करण्याचे आदेश
महा घडामोडी न्यूज प्रतिनिधी,दीपक तायडे,जळगाव : बोदवड तालुक्यातील नांदगाव येथील ग्राम रोजगार सेवक गौतम बाबुराव निकम यांना रोजगार सेवक या पदावरून कमी करण्याचे आदेश. २० मे रोजी प्रभारी गटविकास अधिकारी शशिकांत सोनवणे बोदवड यांनी नांदगाव येथील ग्रामसेवक व सरपंच यांना दिले आहे.
निमखेड शिवारातील गट क्रमांक १६३ मध्ये बाबुराव लक्ष्मण निकम व नांदगाव येथील ग्राम रोजगार सेवक गौतम बाबुराव निकम यांनी एकाच शेतात दोन विहिरीचे महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत अनुदान घेतले होते, परंतु एकाच विहिरीचे खोदकाम व बांधकाम केले होते, दुसऱ्या विहिरीचे अंदाजित अनुदान १ लाख ३४ लाटून भ्रष्टाचार केला होता,
माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्यावतीने जिल्हा कार्याध्यक्ष अर्जन आसने यांनी तक्रार दाखल केली होती, वारंवार तक्रार व स्मरणपत्र, दोन वेळा उपोषण करण्यात आले होते, महासंघाच्या वतीने तक्रारदार आसने यांच्या वारंवार व पाठपुराव्यामुळे यश प्राप्त झाले आहे, तसेच पंचायत समिती या स्थानिक प्रशासन ग्राम रोजगार सेवक गौतम बाबुराव निकम यांनी ग्राम रोजगार सेवक पदावरून कमी करण्याचे आदेश दिले आहेत.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत