खेड घाटातील दरड धोकादायक; पावसाळ्यात ठरु शकते जीवघेणी
खेड घाटातील दरड धोकादायक; पावसाळ्यात ठरु शकते जीवघेणी
महा घडामोडी न्यूज जिल्हा प्रतिनिधी,अविनाश मुंढे, पुणे ; पुणे - नाशिक महामार्गावरील नव्यानेच तयार झालेल्या खेडच्या घाटात बऱ्याच ठिकाणी धोकादायक दरडी दिसून येत आहेत. या रस्त्याचे बांधकाम करणाऱ्या ठेकेदाराकडून ठिकाणी दुरुस्ती करून दरड कोसळण्याचा धोका कमी करण्यात आला आहे,परंतू एक-दोन ठिकाणी कोणत्याही प्रकारची दुरुस्ती केलेली दिसून येत नाही.
पुणे - नाशिक महामार्गावरील नव्यानेच तयार झालेल्या खेडच्या घाटात बऱ्याच ठिकाणी धोकादायक दरडी दिसून येत आहेत. या रस्त्याचे बांधकाम करणाऱ्या ठेकेदाराकडून काही ठिकाणी दुरुस्ती करून दरड कोसळण्याचा धोका कमी करण्यात आला आहे. परंतू एक-दोन ठिकाणी कोणत्याही प्रकारची दुरुस्ती केलेली दिसून येत नाही. त्यामुळे त्या ठिकाणाची दरड पावसाळ्यात कोसळण्याची जास्त शक्यता आहे.
या रस्त्यावरून रात्रंदिवस वाहने धावत असतात. यामुळे दरड कोसळण्याची भीती व्यक्त केली जात असून त्यात जीवितहानी होण्याची शक्यता आहे. संबंधित धोकादायक दरड ठेकेदाराने तत्काळ दुरुस्त करावी आणि संभाव्य धोका टाळवा, अशी मागणी वाहन चालकांकडून करण्यात आली आहे. दरम्यान, याबाबत संबंधित बांधकामांचे ठेकेदारांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता असता तो होऊ शकला नाही.
या रस्त्यावरून माझा नेहमीचा प्रवास आहे. दरड कोसळल्यास वाहतूक बंद होऊन वेळेचा अपव्यय होतो. शिवाय मनस्ताप सहन करावा लागतो. दरड कोसळून जीवितहानी होऊ नये एवढीच अपेक्षा.- अजय मुंढे, वाहनचालक, जुन्नर



कोणत्याही टिप्पण्या नाहीत