रिपब्लिकन सेनेचे अवैद्य रेती उपसा प्रकरणी लेखी आश्वासनानंतर उपोषण मागे
रिपब्लिकन सेनेचे अवैद्य रेती उपसा प्रकरणी लेखी आश्वासनानंतर उपोषण मागे
उपोषणाच्या सहाव्या दिवशी प्रशासनाने घेतली दखल
महा घडामोडी न्युज प्रतिनिधी, परभणी : जिंतूर शहरातील तहसील कार्यालयासमोर अवैद्य रेती उपसा संबंधी विविध मागण्यासाठी रिपब्लिकन सेनेचे तालुका अध्यक्षांनी दिनांक 18 मे पासून आमरण उपोषण सुरू केले होते दरम्यान उपोषणार्थीची प्रकृती बिघडल्या नंतर 23 मे रोजी तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांचा उपस्थितीत लेखी आश्वासन देऊन उपोषण मागे घेण्यात आले.
तालुक्यातील सावळी बु वझर बु आदी गावातील नद्यांमधून जेसीबी मशीन व बोटीच्या साहाय्याने मोठ्या प्रमाण अवैद्य रेती उपसा करण्यात येत आहे म्हणून नियमाप्रमाणे रेती उपसा करण्यात यावा सीसीटीव्ही कॅमेरे बसवावे चेकपोस्ट तयार करण्यात यावे व नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कार्यवाही करावी आदी मागण्यांसाठी रिपब्लिकन सेनेचे तालुका अध्यक्ष शरद चव्हाण यांनी उपोषणाचा मार्ग पत्करला होता.
दरम्यान उपोषणाच्या चौथ्या दिवशी उपोषणकर्ते शरद चव्हाण यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते याची दखल घेत तातडीने तहसीलदार सखाराम मांडवगडे यांच्या आदेशावरून नायब तहसीलदार परेश चौधरी पोलीस निरीक्षक दीपक दंतूलवार यांनी उपोषणार्थीची भेट घेऊन चर्चा करून उपोषण मागे घेण्याची विनंती करून लेखी आश्वासन दिले यावेळी लिंबू पाणी पाजून उपोषण सोडवण्यात आले यावेळी रिपब्लिकन सेनेचे प्रीतम वाकळे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत