Breaking News

प्रहारने दिव्यांगांना तिनचाकी सायकल केले वितरण

 प्रहारने दिव्यांगांना तिनचाकी सायकल केले वितरण

 महा घडामोडी न्युज प्रतिनिधी नरेंद्र मेश्राम, भंडारा : भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यामधील गावागावातील समस्यांचे निराकरण करण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने भंडारा जिल्ह्याचे सचिव जयेंद्र देशपांडे यांनी लाखनी तालुक्यातील कन्हाळगाव गाव येथे एका गरीब कुटुंबातील दोन्ही दिव्यांग बहिण-भावांना शाखा गोंडेगाव येथील शाखा पदाधिकारी यांच्या सहकार्याने तीनचाकी सायकल मिळवून देऊन सायकलचे वाटप केले असता असे निदर्शनास आले की दिव्यांग असलेले दोघे बहिण भाऊ आणि त्यांचे वडील मनोरुग्ण आहे अशा परिस्थितीत आई आणि तिसरा भाऊ यांच्यावर सर्व कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत असतो.

मात्र सुज्ञ असलेला दुसरा भाऊ हा दारूच्या आहारी जाऊन परिवाराकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे कुटुंबाची परिस्थिती अस्ताव्यस्त झाल्याचे दिसून आले तेव्हा आपले मत व्यक्त करतांनी युवावर्ग बेरोजगार अपंग निराश्रित विधवा यांना आवाहन केले आहे की गावागावांमध्ये अनेक समस्या आहे आणि या समस्यांचे निराकरण करण्यासाठी वंदनीय बच्चुभाऊ कडू राज्यमंत्री तथा संस्थापक प्रहार जनशक्ती पक्ष यांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांच्या विचाराने कार्य करण्याची नवयुवक यांची गावागावांमध्ये नवी पिढी शाखा तयार करून आपल्या गावातील समस्या सुटतील या पद्धतीने कार्य करण्याचे आवाहन केले आहे.

सदर सायकल वाटप प्रसंगी प्रामुख्याने उपस्थित जयेंद्र देशपांडे जिल्हा सचिव प्रहार जनशक्ती पक्ष भंडारा, एल. एस. पटेल सहसचिव तालुका लाखणी गोंडेगाव शाखाप्रमुख- महेश सेलोकर उपप्रमुख- शेषराज वाढई  सचिव- अमोल धार्मिक सहसचिव- जयस मानकर संपर्क प्रमुख-श्रीकांत वाढई  सदस्य- रोहित सयाम, दीपक वाढई, प्रवीण हलमारे,विश्वजित कानेकर, सौरभ धार्मिक,अक्षय सर्वे,सौरभ गरपडे तर कन्हालगाव स्थानिक कार्यकर्ते पिरेम हुमे समस्त उपस्थित युवावर्ग महिला भगीनी उपथ्तित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत