बुटीबोरी MIDC मधील वटेघाट शिवारातून दीड लाखाचा मुद्देमाल झाला लंपास
बुटीबोरी MIDC मधील वटेघाट शिवारातून दीड लाखाचा मुद्देमाल झाला लंपास
महा घडामोडी न्यूज नेटवर्क नागपूर ;- हिंगणा तालुक्यातील बुटीबोरी जवळील वटेघाट शिवारातून चोरट्याने विजेच्या तारा, लोखंडी ड्रम चोरून नेले. त्याची एकूण किंमत १ लाख ५० हजार रुपये आहे. एम्स हॉस्पिटल खापरीपर्यंत अंडरग्राऊंड विद्युत लाईन टाकण्याचे काम सुरू असून सध्या काम बंद आहे. वटेघाट शिवारातील साईट येथे ३ बग ३३ केव्हीचे एकूण ३०० मीटर केबल व लोखंडी ड्रम ठेवले होते.
दरम्यान त्या परिसरात कुणीही नसताना चोरट्याने ३०० मीटर केबल तारा व लोखंडी ड्रम चोरून नेले. ही बाब लक्षात येताच साईट मॅनेजर लक्ष्मीकांत केशवराव अहिरकर यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. त्या तारा व लोखंडी ड्रमची एकूण पाच १ लाख ५० हजार रुपये असल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध भादंवि गुन्हा दाखल केला असून त्याचा तपास सुरू केला आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत