आता बाईकच्या मागे बसा, पण हेल्मेट नसेल तर दंड भरा
आता बाईकच्या मागे बसा, पण हेल्मेट नसेल तर दंड भरा
नियम मोडल्यास परवाना तीन महिन्यासाठी रद्द पंधरा दिवसांचा अल्टिमेटम..
अपघातांचे वाढते प्रमाण कमी करण्याच्या दृष्टीने वाहतूक पोलिसांनी कठोर पावले उचलत कारवाई सुरू केली आहे, वाहतूक पोलिसांनी यापूर्वी आयुक्तांच्या आदेशाने विरुद्ध दिशेने वाहने चालवणाऱ्यांना चालकांविरुद्ध तसेच बेदरकारपणे गाडी चालवणाऱ्या वर गुन्हा दाखल करण्यास सुरुवात केली, त्याचप्रमाणे विना हेल्मेट वरील कारवाईचा वेगही वाढत असून दिवसाला 100 ते 1500 जणांवर कारवाई करण्यात येत आहे
6 एप्रिल ते 7 मे दरम्यान 56498 गुन्हा नोंद 5448 जणांचे वाहन परवाने रद्द करण्यासाठी आरटीओकडे प्रस्ताव पाठविला आहे. आरटीओ विभाग कारवाई करण्यात येत आहे. त्या पाठोपाठ आता बाईकवर मागे बसणाऱ्या व्यक्तीलाही हेल्मेट घालने सक्तीचे करण्यात आले आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास पाचशे रुपये दंड तसेच तीन महिन्यांसाठी परवाना रद्द करण्याची कायद्यामध्ये तरतूद आहे त्यानुसार कारवाई करण्यात येईल.
मुंबईत 45 टक्क्याहून अधिक अपघात राज्यात घडलेल्या रस्ते अपघात आणि पैकी तब्बल 45 टक्क्याहून अधिक अपघात मुंबईत घडल्याचे समोर आले आहे 29383 अपघातांत पैकी 8768 अपघात हे एकट्या मुंबईत घडल्याचे जानेवारी ते एप्रिल 2022 दरम्यान या आकडेवारीवरून उघड झाले आहे.
554 अपघात अहमदनगरमध्ये, पुण्यात 539, नाशिकमध्ये 536, तर कोल्हापुरात 406 अपघात घडले दरम्यान कोरोना काळात लॉकडाऊन मध्ये मोठ्या प्रमाणावर दुचाकींची खरेदी झाली त्यामुळे मुंबईतील वाहनांची संख्या 40 लाखांचा ही पुढे गेली असून त्यात 22 ते 24 लाख दुचाकींचा समावेश आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत