Breaking News

यशोधन विहार या खाजगी वसाहतीला गावकऱ्यांच्या हक्काचे पाणी पळविणार

 

यशोधन विहार या खाजगी वसाहतीला गावकऱ्यांच्या हक्काचे पाणी पळविणार

बिल्डरला खूष करण्यासाठी सत्ताधाऱ्यांचा प्रताप.

नांदा येथील प्रकार



महा घडामोडी न्यूज नेटवर्क,चंद्रपूर : खाजगी वसाहत म्हटल की सदनिकेच्या सर्व सोई सुविधाची व्यवस्था बिल्डरला करावी लागते परंतू नांदा येथील होत असलेल्या यशोधन विहार या खाजगी प्रकल्पातील सदनिकांना नांदा ग्रामपंचायत पाणी पुरवठा करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

सविस्तर वृत्त असे की, नांदा फाटा पिंपळगाव रोड वरती मागील 2 वर्षा पासून यशोधन विहार सदनिकांचे बांधकाम सुरू आहे. अनेक लोकांनी त्या ठिकाणी सदनिका घ्यायला फॉर्म सुध्दा भरले आहे. त्यात सर्व सोई सुविधाचा उल्लेख सुध्दा करण्यात आला आहे. परंतू बांधकाम करण्यात येत असलेल्या सदनिका या खाजगी असल्याने नांदा ग्राम पंचायत पाणी पुरवठा कशी काय करणार हा प्रश्न कायम आहे.

२९/११/२०१९ मध्ये झालेल्या सभेमध्ये यशोधन विहार या खाजगी सदनिकांना नांदा ग्रामपंचायतीने नाहरकत दिली . त्याच सभेत ९/१ या विषयात त्यांनी यशोधन विहार ला ५ लाख ५० हजार लिटर पाणी दररोज पुरविण्यात येईल असा ठराव मंजूर केला अशी माहिती अधिकारात माहिती समोर आली आहे.

विशेष म्हणजे नुकत्याच सुरू झालेल्या जलस्वराज्य पाणी पुरवठा योजनेची पाईप लाईन गावात व नांदा फाटा येथील काही भागात पोहाचीलस नाही मात्र यशोधन विहार कडे ११ लाख रुपये खर्च करून नवीन पाईप लाईन टाकण्यात आली. एकीकडे गावातील लोकांना नळ कनेक्शन नाही परंतू दुसरी कडे लाखो रुपयाची तरतुद करून व ५ लाख ५० हजार लिटर पाण्याची ठराव मंजूर करून सत्ताधाऱ्यांनी बिल्डर ला खूष करण्यासाठी हा उठाठेव केल्याचे निदर्शनास येत आहे.

ग्रामपंचायतीने ठराव घेतला त्यात १३ ग्रामपंचायत सदस्य याचा स्वाक्षरी आहे. परंतू त्यातील २ ग्रामपंचायत सदस्य सोडले तर बहुतांश सदस्यांना ठराव घेण्यात आला याची माहिती देखील नाही.

फायद्यासाठी सदस्यत्व ठेवले गहाण  

सभेला उपस्थित १३ सदस्यांपैकी सरपंचासह ११ सदस्यांनी यशोधन विहारला पाणीपुरवठा व साफसफाई करण्याचा ठराव सभेत आलाच नाही असे मत व्यक्त केले प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सर्वाना घरे असी जाहिरात करून सदनिकांची बुकिंग सुरू आहे गावकर्‍यांच्या हक्काचे पाणी सदनिका देणे योग्य नाही बिल्डर पैसे कमविणार व ग्रामपंचायत पाणीपुरवठा करणार आहे का ? बिल्डरच्या फायद्यासाठी आपले सदस्यत्व गहाण ठेवून बनावट व खोटा ठराव तयार करून देणे कितपत  योग्य आहे.

गावकऱ्यांच्या हक्काचे पाणी बिल्डरला 

सरपंचासह ११ सदस्यांच्या मते ठराव सभेत आलाच नाही तर ठराव कोणी व कसा दिला असा उलट सवाल उपस्थित केला जात आहे उपसरपंच व एका ग्रामपंचायत सदस्याने इतर सदस्यांची संमती नसतानाही रात्रीच्या अंधारात बनावट ठराव बिल्डराच्या फायद्यासाठी बनवून दिलेला आहे जनतेचे सेवक बिल्डरची सेवा करीत असल्याने त्यांच चांगभल होत असून गावकऱ्यांच्या पाणी बिल्डरला दिल्याने गावकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे.

प्रतिक्रिया 

गावातील नागरीकांनाच पाण्याचा नियमित पुरवठा होत नाही तर यशोधन विहारला ५.५० लक्ष लीटर पाणी दररोज देण्याचा बनावट ठराव करुन दिला जातो शाळेवर  नोकरी करणार्‍या ग्रामपंचायत सदस्याने गावकर्‍यांची दिशाभूल करून  श्रीवास्तव ऍण्ड कंपनीला खूश करण्यासाठी खोटा ठराव तयार करून दिला आहे.

(प्रिया राजगडकर,माजी ग्रामपंचायत सदस्य नांदा)

प्रधानमंत्री आवास योजना व म्हाडा च्या नावाखाली ४.५० लाख रुपयांपर्यंत अनुदानाचे आमिष देऊन जाहिरातबाजी करून प्लॉट विक्री सुरू आहेत  याच यशोधन विहार करीता ग्रामपंचायतीच्या काही सदस्यांनी आपले सदस्यत्व गहाण ठेवून पाणी पुरवठा करण्याचा ठराव मिटींगमध्ये न ठेवता संगनमताने परस्पर बनवून दिला आहे माझा समोर असा कुठलाही ठराव वाचून दाखविला नाही व समंतीने घेतलेला नाही.

(घागरु कोटनाके,माजी सरपंच ग्रामपंचायत नांदा)

यशोधन विहारला ग्रामपंचायत पाणीपुरवठा करणार हा ठराव बोगस आहे सभेत हा विषय आलाच नाही श्रीवास्तव यांचे शाळेवर असणार्‍या ग्रामपंचायत सदस्याने गाव हित बाजुला ठेवुन असा खोटा ठराव रात्रीच्या अंधारात केला आहे. यशोधन  विहारला पानी देणे स्थानिक करदात्यांवर अन्यायकारक आहे बोगस ठराव रद्द करण्याची मागणी करणार आहे  

अभय मुनोत, माजी ग्रामपंचायत सदस्य नांदा

यशोधन विहार प्रकल्पाला  नाहरकत प्रमाणपत्र व पाणी पुरवठ्यासह सोयीसुविधा देण्याबाबत जो ठराव घेण्यात आलेला होता त्यासमंधाने तक्रार प्राप्त झाल्यास चौकशी करुन उचित कारवाई केली जाणार ठराव जरी घेतला असेल नियमबाह्य असल्यास रद्द करता येतो. 

(दिलीप बैलनवार ,प्रशासक ग्रामपंचायत नांदा)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत