Breaking News

राष्ट्रीय महामार्ग 353-B ची दुरवस्था; अर्धवट कामांमुळे अपघातांचे सत्र सुरू, तातडीने उपाययोजनांची मागणी

 राष्ट्रीय महामार्ग 353-B ची दुरवस्था; अर्धवट कामांमुळे अपघातांचे सत्र सुरू, तातडीने उपाययोजनांची मागणी

महा घडामोडी न्यूज जिल्हा प्रतिनिधी, शेख हक्कानी, चंद्रपूर :  जिल्ह्यातील राजुरा तेलंगाना सीमेला जोडणारा आदिलाबाद राष्ट्रीय महामार्ग 353 बी या मार्गावरील राजुरा ते तेलंगाना सिमेवरील परसोडा गावापर्यंत रस्त्याची काम युद्ध पातळीवर करण्यात आले होते. रस्त्याच्या कामासाठी वापर करण्यात आलेल्या नाल्यावरील माती, मुरूम, दगड वाहतुकीमुळे रस्ते अत्यंत नासघुस व खड्डेयुक्त झाले असून, रस्त्यावर वाहन चालवताना जनसामान्यांना रोज कसरत करावी लागत आहे.

 या भागातील अनेक नाले उपसा करून मोठ्या प्रमाणात वाहतूक करण्यात आली, मात्र अवजड वाहतुकीमुळे अनेक रस्ते नासघुस होऊन ठीकठिकाणी खड्डे पडलेले आहेत, यामुळे या इन्फ्रा कंपनीने दुरुस्तीची कोणती मोहीम राबविली नसल्याने, धानोली ते कुसळ, माथा फाटा, बोरगाव, हातलोणी, रूपापेठ, पारडी, टांगारा, मांडवा, चनई इत्यादी रस्ते अत्यंत निकृष्ट झाले आहे. तर पुर्वीच्या रस्त्यावरील प्रवासी निवारे उध्दवस्त केल्याने आर्वी, हरदोना, थुट्रा, धामनगाव, बेलगाव फाटा, वडगाव, रामपुर फाटा, देवघाट, लोणी, माथा फाटा, कन्हाळगाव, अकोला, चोपन, रूपापेठ, कोठोडा, गोविन्दपुर, दुर्गाडी इत्यादी ठिकाणी प्रवाश्यांना बसण्याची व्यवस्था नाही.

 उन्हात पावसात कुठल्याही बसस्टॉपवर प्रवासी निवारे उभारण्यात आलेले नाही, अनेक ठिकाणी कुपनलिका (बोरची) व्यवस्था होती ते सर्व कुपनलीका जि आर आय एल इन्फ्रा या कंपनी संपुर्ण बोअरवेल खोलून घेऊन गेल्याने नागरीकांच्या तुष्णा भागविण्याचा प्रश्न निर्माण झाला, प्रवाश्याना पिण्याची पाण्याची व्यवस्था निर्माण करावी, प्रवासी निवारे निर्माण करण्याची नितांत गरज आहे.

 दुभाजक ठिकाणी गुराचा चारा व झाडे लागवड झाल्याने  गुराढोरांचे वावर मोठ्या प्रमाणात झाल्याचे चित्र दिसून येत आहे. जनावरांमुळे अनेक अपघात होऊन दुःखापत व जिवाला मुकण्याची नामुष्की ओढवली आहे, दुभाजक लोखंडी कठडे लावण्याची स्थायी नागरिकांची सतत मागणी होत आहे, या कंपनीच्या अनेक ठिकाणी कामे अपुर्ण असताना मात्र देवघाट टोल नाक्यावर टोल वसुली सप्टेबर २०२५ पासून कंपनीने सुरु केले आहे, गडचांदूर येथिल उड्डानपुल अजून काम सुरू असताना मात्र टोल वसुली सुरू आहे. या भागातील अंतर्गत रस्ते वाहतुकीमुळे खराब झालेले प्रवासी निवारे सुरक्षा कठडे बोरवेले सुविधा निर्माण करण्याची मागणी राष्ट्रवादी कांग्रेसचे प्रदेश सचिव आबिद अली यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत