Breaking News

पळसाच्या झाडाला गळफास लावत महिलेची आत्महत्या

ळसाच्या झाडाला गळफास लावत महिलेची आत्महत्या


महा घडामोडी न्यूज नेटवर्क,चंद्रपूर :
चिमूर तालुक्यातील खडसंगी येथील वनविभागाच्या नर्सरी मागील जंगल परिसरात पळसाच्या झाडाला दुप्पट्याच्या साह्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना, दिनांक 19 मे रोज गुरुवार ला 9: 30 वाजताच्या दरम्यान उघडकीस आली, 

मृतक महिलेचे नाव कुंता दसरु मेश्राम वय 65 वर्ष राहणार खडसंगी, ही सकाळी संडासला जातो म्हणून गेली मात्र खूप वेळ होऊनही घरी परत आली नाही, त्यामुळे घरच्यांनी शोधाशोध केली असता, वन विभागाच्या नर्सरीत मागील जंगल परिसरात पळसाच्या झाडाला गळफास घेऊन असलेली दिसली, त्यामुळे पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली, 

पोलीस उपनिरीक्षक अलीम शेख व पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करून मर्ग दाखल केला, प्रेत शवविच्छेदना करिता उपजिल्हा रुग्णालय चिमूर येथे पाठविण्यात आले, मृतक महिला मुरपारची असून मानसिक आजाराच्या उपचाराकरिता खडसंगी येथे राहत होती, आत्महत्येचे कारण अजून कळू शकले नाही, तरी पुढील तपास चिमूर पोलिस स्टेशनचे ठाणेदार मनोज गभने यांच्या मार्गदर्शनात चिमूर पोलिस करीत आहेत,

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत