बोदवड तालुक्यास क्रीडा संकुल मिळावे ; खासदार सुप्रिया सुळें कडे डॉक्टर सेल चे प्रदेश सचिव आतिष चौधरी यांची मांगणी.
बोदवड तालुक्यास क्रीडा संकुल मिळावे ; खासदार सुप्रिया सुळें कडे डॉक्टर सेल चे प्रदेश सचिव आतिष चौधरी यांची मांगणी.
महा घडामोडी न्यूज प्रतिनिधी,जितेंद्र गायकवाड,बोदवड ; बोदवड तालुक्यात एकही क्रीडा संकुल नसल्याने विद्यार्थ्यांच्या तसेच खेळाडूंच्या कलागुणांना वाव मिळत नसल्याने तालुक्यात क्रीडा संकुल मंजूर व्हावे अशी मांगणी राष्ट्रवादी चे डॉक्टर सेल चे प्रदेश सचिव अतिष चौधरी यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे केली.
निवेदनात बोदवड तालुक्यात क्रीडा संकुल नसल्याने तालुक्यातील युवक युवतींना सैन्य भरती, पोलीस भरती साठी मैदान उपलब्ध नाही. त्यामुळे तालुक्यातील युवक युवती इतर तालुक्याच्या तुलनेत मागे पडत आहेत. त्या अनुषंगाने क्रीडा प्रेमींचा उत्साह वाढविण्यासाठी व युवकांच्या भविष्यासाठी आपण सकारात्मक निर्णय घ्यावा व बोदवड तालुक्यासाठी आपल्या माध्यमातून क्रीडा संकुल मिळावे अश्या मांगणीचे निवेदन दिले.
त्यावेळी राष्ट्रवादी डॉक्टर सेल चे प्रदेश सचिव डॉ अतिष चौधरी, माजी सभापती किशोर गायकवाड,गटनेते जफर शेख,नईम खान बागवान, गोपाल गंगतिरे, पारधी सर, हकीम बागवान, आदी उपस्थित होते....



कोणत्याही टिप्पण्या नाहीत