बेरोजगारीला कंटाळून थेट बनावट नोटांच्या छपाईच्या टाकला धंदा
23 वर्षीय तरुण पोलिसांच्या ताब्यात
महा घडामोडी न्यूज प्रतिनिधी, जळगाव : दिवसेंदिवस बेरोजगारीचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे तरुणाई झटपट पैसे कमावण्याच्या नादात गुन्हेगारीकडे वळल्याची अनेक उदाहरणे समोर आली आहेत. त्यातच आता आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका तरुणाला रोजगार नसल्याने त्याने थेट बनावट नोटांच्या छपाईच्या अवैध मार्ग निवडल्याचे समोर आले आहे. उमेश चुडामण राजपूत असे या 23 वर्षीय तरुणाचे नाव आहे.
गुरुवारी रात्री त्याला अटक करण्यात आली. पहूर पोलिसांनी ही कारवाई केली.आरोपी उमेश हा जामनेर तालुक्यातील पुनर्वसित हिंगणा तालुक्यातील रहिवासी आहे. त्याच्या घरची परिस्थिती बेताची आहे. तर त्याचे शिक्षण हे दहावीपर्यंत झाले आहे. त्याच्या वडिलांचेही निधन झाले आहे. तर आई, दोन भाऊ आणि बहिण असा त्याचा परिवार आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत