समर्पन समूहाचा 4 था वर्धापन दिन 5 जूनला
समर्पण समूहाचा 4 था वर्धापन दिन 5 जूनला
महा घडामोडी न्युज तालुका प्रतिनिधी,खेमचंद नेरकर, वरोरा : मद्यपाश आजाराला बळी पडलेल्या लोकांसाठी काम करणाऱ्या अल्कोहॉलिक्स ऍनानिमस या संघटनेची एक शाखा असलेल्या वरोरा येथील समर्पण समूहाला स्थापन होऊन 4 वर्ष पूर्ण झाल्यामुळे या समूहाचा 4 था वर्धापन दिन सोहळा येत्या 5 जून 2022 रविवार ला साजरा करण्यात येत आहे.
या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून सौ प्रतिभाताई धानोरकर, आमदार वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्र या उपस्थित राहणार असून प्रमुख अतिथी म्हणून श्री अहेतश्याम अली, माजी नगराध्यक्ष न प वरोरा व मा. डॉ.श्री पवन डोंगरे यांची उपस्थित लाभणार आहे.अमेरिकेतील बिल डब्ल्यू डॉ. बॉब यांनी ही संगत सुरू केली आहे.
अल्कोहॉलिक्स ऍनानिमस या संघटनेच्या शाखा सर्व जगभर पसरलेल्या असून त्याचीच एक शाखा वरोरा शहरात असून समर्पण समूह या नावाने ओळखली जाते. या समूहाच्या मीटिंग प्रत्येक आठवड्याच्या सोमवार व शुक्रवार ला सायंकाळी 7 ते 8.30 या वेळी तर रावीवरला सकाळी 7.30 ते 9 या वेळेस नेहरु चौकतील नेहरू उर्दू शाळेत भरत असते. या मीटिंग च्या माध्यमातून आजघडीला वरोरा शहरातील शेकडो लोक दारूपासून दूर असून अनेकांचे उघड्यावर पडलेले संसार सुरळीत सुरू आहेत.
सदर वर्धापन दिन कार्यक्रम 5 जुन 2022 रविवार ला सायंकाळी 6 ते 8 या वेळी संपन्न होत असून या कार्यक्रमाला शहरातील सर्व नागरिकांनी कुटुंबियांसह उपस्थित राहून कार्यक्रम समजून घ्यावा असे आवाहन समूहाच्या सर्व सभासदांनी केले असून ज्यांना दारू या समस्येने ग्रासले आहे त्यांनी या मोबाईल वर संपर्क साधावा उमेश के 9960818675, संजय बी 7741075434



कोणत्याही टिप्पण्या नाहीत