Breaking News

राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमीत्त बाइक रॅली

राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमीत्त बाइक रॅली


महा घडामोडी न्युज तालुका प्रतिनिधी,खेमचंद नेरकर,वरोरा : राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती अहिल्यादेवी होळकर वृद्धाआश्रम येथे मंगळवार ला पार पडली. जंयती निमीत्त बाइक रॅली काढन्यात आली. या बाईक रॅलीत पन्नास युवक युवतीनी सहभाग घेतला होता.

 छत्रपती शिवाजी महाराज ,शहीद योगेश डाहुले स्मारक, महात्मा गांधी पुतळा, डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा व बिरसा मुंडा स्मारकाला अभिवादण करून बाईक रैली कार्यक्रम स्थळी पोहोचली. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष गजानन शेळकी, कार्यक्रमाचे उद्दघाटक डॉ प्रफुल खुजे, प्रमुख अतिथी डॉ सरोदे, डॉ प्रभाकर लोंढे, समाजसेविका तथा संचालीका अहिल्याबाई होळकर वृद्धाआश्रम सोनुबाई येवले, छायाताई धवने, अड उज्वला चिडे, अड मुंगल, उत्सव समिती चे अध्यक्ष अजिक्य काळे आदी उपस्थीत होते.

 कार्यक्रमाचे संचालन गणेश चिडे, प्रस्तावीक संजय बोधे यांनी केले. कार्यक्रमादरम्यान बरडेताई यांनी सर्वांना अहिल्यादेवी होळकरांच्या कार्याप्रती प्रामाणीक राहन्याची शपथ दिली. उत्सव समितीचे संघटक भुषणदादा झिले यांनी सर्वांच्या जेवणाची व्यवस्था केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत