Breaking News

नाशिक पुणे महामार्गावर दोन मालवाहू कंटेनरचा अपघात

दोन्ही कंटेनरचे मोठे नुकसान, जीवितहानी झाली नाही

महा घडामोडी न्युज तालुका प्रतिनिधी,नवनाथ दिघे,अकोले : आळेफाटानजीक दोन मालवाहू कंटेनरचा अपघात झाला. यामध्ये दोन्ही कंटेनरचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. शनिवारी पहाटे हा अपघात झाला. अचानक दोन कंटेनर समोर आल्याने एक रस्त्याच्या कडेला पाळती झाला तर दुसरा नियंत्रण सुटल्याने टायर दुकानाची पत्र्याची भिंत पाडून आत घुसला.

याबाबत अधिक माहिती अशी की, आळेफाट्या नजीक दोन मालवाहू कंटेनरचा अपघात झाला. अचानक समोर कंटेनर आल्याने वाहनावरील नियंत्रण सुटून इंदोर (मध्यप्रदेश ) येथून पुण्याकडे जाणारा कंटेनर NL 01 AD 8531 रस्त्याच्या कडेला असलेल्या टायर दुकानाची पत्र्याची भिंत पाडून आत घुसला.

 तर पुण्याकडून नाशिककडे जाणारा कंटेनर DD 03 K9408 रस्त्याच्याकडेला पलटी झाला. यावेळी झालेल्या मोठ्या आवाजाने आजूबाजू लोक जमा झाले. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र कंटेनरचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. दुपारपर्यंत वाहणे त्याच जागेवर होती. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत