Breaking News

शेवटच्या माणसापर्यंत केंद्रसरकारच्या योजनांची माहिती पोहचवा- प्रकाश गाडे

 शेवटच्या माणसापर्यंत केंद्रसरकारच्या योजनांची माहिती पोहचवा- प्रकाश गाडे

चंद्रपुरात भाजपा सोशल मीडियाची बैठक संपन्न

महा घडामोडी न्यूज नेटवर्क,चंद्रपूर : मोदी सरकारने आठ वर्षे यशस्वीरित्या पूर्ण करून जनसामान्यांचे प्रश्न सोडविण्याच्या दृष्टीने मोठी मजल मारली आहे. शेवटच्या माणसापर्यंत सोशल मीडियाच्या माध्यमातून केंद्रसरकारच्या योजनांची व निर्णयाची माहिती सर्वदूर पोहचविण्यासाठी प्रत्येक सोशल मीडिया कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावा ,असे प्रतिपादन भाजपा महाराष्ट्र प्रदेश सोशल मीडिया प्रमुख प्रकाश गाडे यांनी शनिवार 11 जूनला चंद्रपूर येथे केले.

माजी अर्थमंत्री आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी सबंध महाराष्ट्रासोबतच अनेक विकासकामे आणत चंद्रपुरचा चेहरा मोहरा बदलला आहे . अनेक मोठे निर्णय सुधीरभाऊंनी घेतले , सुधीरभाऊंनी घेतलेले निर्णय व विकासकामे आपण ताकतीने लोकांपर्यंत पोहचवले पाहिजे, ते लोकनेते आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात,सोशल मीडिया चंद्रपूर प्रमुखांच्या बैठकीत ते अध्यक्ष म्हणून शासकीय विश्राम गृह येथे आयोजित चंद्रपूर जिल्हा भाजपा सोशल मीडियाच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते.

यावेळी विदर्भ सोशल मीडिया प्रमुख(पूर्व)लकीसिंग चावला,प्रदेश सदस्य स्वानंद कोंडलीकर,भाजपा महामंत्री सुभाष कासंगोट्टूवार,ब्रिजभूषण  पाझारे,श्रीकांत मलोझलवार भाजपा जिल्हा प्रसिद्धी प्रमुख चंद्रपूर ( ग्रा.),राकेश कोंडबतूनवार भाजपा/सोशल मीडिया प्रमुख चंद्रपूर( ग्रा) , सोशल मीडिया विदर्भ प्रमुख(महिला)लक्ष्मी सागर,प्रशांत विघ्नेश्वर,कल्पना पलोजवार,अनिरुद्ध भालेराव,निमेश लाखेवार,आशीष नुगुरवार,आशीष चावडा यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

यावेळी प्रकाशजी गाडे यांनी सोशल मीडियातील येणाऱ्या अडचणी,उपक्रमशीलता, सक्रियता आणि सर्वात महत्त्वाचे संघटनशीलता याबाबत सविस्तर माहिती देत कार्यकर्त्यांसोबत सुसंवाद साधला.बैठकीला संपूर्ण भाजपा जिल्हा व महानगराची सोशल मीडिया कार्यकारिणी उपस्थित होती.यावेळी उपस्थित मान्यवरांचे लोकनेते आ.मुनगंटीवार यांच्या विकास कामांचा लेखाजोखा प्रस्तुत करणारे पुस्तक सिंहावलोकन पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला.

श्रीकांत मलोझलवार यांनी प्रास्ताविकात सोशल मीडियाच्या बूथ स्तरावरील कार्यकारण्या लवकरच पूर्ण करण्याचे आश्वासन प्रकाश गाडे यांना दिले.यावेळी मयूर चहारे, मयूर व्यास, गौरव चक्रवर्ती, हार्दिक सूचक,दिनेश कुत्तरमारे,डॉ.भारती दुधानी,आकाश मस्के यांची उपस्थिती होती.विघ्नेश्वर यांनी आभार मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत