मधुकर सहकारी साखर कारखाना कामगार यांच्या हक्कासाठी पुन्हा वंचितचे जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे आक्रमक
मधुकर सहकारी साखर कारखाना कामगार यांच्या हक्कासाठी पुन्हा वंचितचे जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे आक्रमक
महा घडामोडी न्युज प्रतिनिधी,जितेंद्र गायकवाड,जळगाव : यावल तालुक्यातील फैजपुर येथिल मधुकर साखर कारखाना येथिल कामगार यांच्या न्याय हक्का साठी आज दि.१२ जुन रोजी फैजपुर येथिल कामगार यांनी वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष विनोदभाऊ सोनवणे यांना त्यांच्या समस्या कळून आम्हाला न्याय द्या व आमचा हक्काचे मानधन आम्हाला मिळवून द्या आम्हाला फक्त वंचित बहुजन आघाडी राष्ट्रीय अध्यक्ष ॲड.बाळासाहेब आंबेडकर व वंचित बहुजन आघाडी कार्यकर्ते आम्हाला आमचा हक्क मिळवून देऊ शकता असा विश्वास आम्हाला आहे असे मधुकर सहकारी साखर येथील कामगार म्हणाले.
वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष बैठकित बोलताना म्हणाले कि मधुकर सहकारी साखर कारखाना येथिल कामगारांच्या हक्काचे ४० महिन्या पासुन थकित राहिले पगार व इतर माधन कामगार यांना मिळवून दिल्या शिवाय शांत बसनार नाही त्यासाठी रस्त्यावर उतरण्यासाठी तयार आहे, वेळप्रसंगी मोठे आंदोलना साठी तयार रहा असे आवाहन विनोद सोनवणे यांनी कामगारांना केले.आज वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कामगार यांच्या झालेल्या बैठकित आंदोलनाची पुढील रूपरेषा ठरविन्यात आली.
या वेळी कामगार युनियन अध्यक्ष किरण चौधरी,सरचिटणीस सुनिल कोलते,वंसत पाटील,लिलाधर पाटिल,अरूण पाटील,सतिष बोंडे, जिवन बालाईन, इच्छाराम बरडे,दिलिप पाटील, सचिन बोंडे, महेश चौधरी,संजय कोलते,हेमराज चौधरी, योगेश होले, सुनिल अडकमोल,राकेश नेमाडे,राजेद्र जेतकर,नितिन कोळी,सतिश पाटील, मनमोहन महाजन, अशोक महाजन,पंढरिनाथ पाटील,कुमार पाटिल, जिवन फेगडे,एम.पी पाटिल, सुधिर राणे,तुषार चौधरी, प्रकाश ठोसरे,वसंत चौधरी,करण जैन,हमीदशाह बिसमिलनशाह, मोहन जोशी, हेमंत इंगळे,गिरिष कोळंबे,यादी कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते,



कोणत्याही टिप्पण्या नाहीत