तुमसर कार्यालयावर धडकला हज्जारो टॅक्टर सहित
तुमसर कार्यालयावर धडकला हज्जारो टॅक्टर सहित
शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा, अनेक जुने विक्रम तुटले !
महा घडामोडी न्युज प्रतिनिधी,भंडारा : किसान गर्जना व्दारे काढण्यात आलेला आक्रोश मोर्चा अतिशय विराट होता,हज्जारो ट्रॅक्टर सहित मोठ्या संख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते,बोनस व इतर मागण्यांसाठी शेतकरी बांधव खुप सरसावले होते, राजेंद्र पटले यांच्या नेतृत्वात सदर विक्रम मोडणारा ट्रॅक्टर मोर्चा खुप भयानक होता,त्यांनी आपल्या संबोधनात खूप रोष व्यक्त केला,
विधानसभा निवडणुकीत धानाला पाचही वर्ष रू ७००/- प्रति क्विंटल बोनस देऊ असे वचन दिल्यामुळे शेतकऱ्यांनी ५ वर्षासाठी शासनाला निवडून दिले होते,परंतु वचनपूर्ती न कर्ता या वर्षी बोनस गहाळ करून शेतकऱ्यांचा विश्वास घात केला,जि.प.च्या निवडणुकीच्या प्रचारात अनेक मान्यवर नेत्यांनी तेज तर्रार भाषणाच्या व्दारे डि.बी.टी.च्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना बोनस देण्यात येईल असे सुध्दा वचन दिले होते,तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हज्जार प्रोत्साहन राशी देण्यात येईल असे वचन सुध्दा दिले होते,
परंतु वचन पुर्ण न केल्यामुळे शेतकरी बांधव अत्यंत आक्रोश मध्ये होते,आज पुर्ण भडास सदर शक्तीशाली मोर्च्यात बघायला मिळाली,पुन्हा आता रब्बी हंगामातील धान अत्यंत कमी क्विंटल प्रति एकर घेण्याचा विचार शासन घेत आहे,परंतु आम्ही शेतकरी झोपलेले नसून जागृत आहोत,बोनस/डि.बी.टी.ची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर त्वरित जमा झालीच पाहिजे,५० हज्जार प्रोत्साहन राशी त्वरित खात्यावर जमा झालीच पाहिजे,२० क्विंटल प्रति एकर रब्बी हंगामातील धान घेण्याचे जाहीर झालेच पाहिजे,तसेच ज्या मान्यवर शेतकऱ्यांचे ७/१२ आन लाईन झालेले नाहीत त्यांचे आन लाईन करण्याची साईट नेहमीच सुरू असलीच पाहिजे.
पावसाळा तोंडावर असताना सुद्धा अद्याप धान खरेदी का सुरू झालेली नाही ती त्वरित सुरू झालीच पाहिजे, शेतकऱ्यांचे शेतावरील विद्यृत बिल नेहमीसाठी मुक्त करण्यात यावे अन्यथा धानाला रू ३०००/- प्रति क्विंटल आधारभूत किंमत तरी जाहीर झालीच पाहिजे,उसर्रा पुलाची SIT चौकशी झालीच पाहिजे व उर्वरित सिंचन प्रकल्पांचे कालवे त्वरित पूर्ण झालेच पाहिजे, ह्या सर्व अतिशय रास्त मागण्या असुन शासनाने त्वरित मान्य करावे यासाठी " किसान गर्जना " व्दारे भव्य धडक विक्रमी विराट ट्रॅक्टर मोर्चा आज तुमसर येथे काढण्यात आला असून सर्व शेतकरी आता संघटीत झाले असल्याची चर्चा सगळीकडे चर्चेत आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत