Breaking News

२०२२ च्या पोलीस भरतीमध्ये १८ डिसेंबर २०२१ ते ३१ डिसेंबर २०२२ मध्ये ज्याचा वयोमर्यादा संपले आहे अशा विद्यार्थ्यांना २०२२ च्या पोलीस भरती मध्ये संधी द्या-सुदाम राठोड

 

२०२२ च्या पोलीस भरतीमध्ये १८ डिसेंबर २०२१ ते ३१ डिसेंबर २०२२ मध्ये ज्याचा वयोमर्यादा संपले आहे अशा विद्यार्थ्यांना २०२२ च्या पोलीस भरती मध्ये संधी द्या - सुदाम राठोड

महा घडामोडी न्यूज तालुका प्रतिनिधी,शेख हक्कानी, जिवती ;-  जय विदर्भ पार्टीचे नेते सुदामभाऊ राठोड यानी १८ डिसेंबर २०२१ ते ३१ डिसेंबर २०२२ यामध्ये ज्या विद्यार्थ्यांचे वायोमर्यादा संपलेले आहे या विद्यार्थ्यांची दखल घेऊन तहसीलदार जिवती यांच्या मार्फत गृहमंत्री महाराष्ट्र राज्य यांना निवेदनाद्वारे विंनती करण्यात आली की २०२२ च्या पोलीस भरतीमध्ये शासन निर्णयानुसार सर्व विद्यार्थ्यांना संधी मिळेल अशी माफक अपेक्षा केली.०१ मार्च २०२० ते १७ डिसेंबर २०२१ पर्यंतचा शासन निर्णय तात्काळ रद्द करून १८ डिसेंबर २०२१ ते

 

 ३१ डिसेंबर २०२२ मध्ये वयोमर्यादा संपलेल्या सर्व विद्यार्थ्यांना २०२२ च्या पोलीस भरतीमध्ये प्रवेश मिळवून द्याल अशी विंनती निवेदनाद्वारे गृहमंत्री यांना सुदामभाऊ राठोड यांनी केला आहे. ही आमची मागणी पूर्ण न झाल्यास जय विदर्भ पार्टी तीव्र आंदोलन करेल असा इशारा देण्यात आला. यावेळी जय विदर्भ पार्टीचे नेते सुदामभाऊ राठोड, सोशल मीडिया चंद्रपूर जिल्हाध्यक्ष विशाल राठोड, जय विदर्भ पार्टी जिवती तालुकाध्यक्ष रियाजभाई सय्यद, युवा आघाडी जिवती तालुकाध्यक्ष रामेश्वर पोले,सामाजिक कार्यकर्ता भारत चव्हाण उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत