Breaking News

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची मोर्चेबांधणी करण्यासाठी खासदार ओमराजे निंबाळकर औसा व निलंगा मतदारसंघात सभा घेणार : जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने

 स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची मोर्चेबांधणी करण्यासाठी खासदार ओमराजे निंबाळकर औसा व निलंगा मतदारसंघात सभा घेणार : जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने

महा घडामोडी न्युज प्रतिनिधी लातूर : महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संभाजीनगर येथील 8 जून च्या शिवसेना शाखा वर्धापन दिनाचे औचित्य साधून होणाऱ्या जाहीर सभेच्या पार्श्वभूमीवर निलंगा विधानसभेतील हलगरा औसा विधानसभेतील कासार शिरशी येथे जाहीर सभेचे नियोजन करण्यात आले असल्याचे आज पत्रकार परिषदेमध्ये लातूर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मुख शिवाजीराव माने यांनी सांगितले. 

    या पत्रकार परिषदेसाठी जिल्हाप्रमुख माने यांच्यासोबत उपजिल्हाप्रमुख विनोद आर्य माजी तालुकाप्रमुख ईश्वर पाटील शहर प्रमुख सुनील नाईकवाडे शहर संघटक हरिभाऊ सगरे मुस्तफा शेख रेखाताई पुजारी अजिंक्य लोंढे युवा सेनेचे अण्णासाहेब मीरगाळे प्रशांत वांजरवाडे आदी उपस्थित होते पुढे बोलताना माने म्हणाले,

 मराठवाड्यातील पहिली शिवसेनेची शाखा 1985 साली संभाजीनगर( औरंगाबाद) येथे माननीय शिवसेनाप्रमुख हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये स्थापन करण्यात आली होती या शाखेचा वर्धापन दिन साजरा करण्याचा निर्णय शिवसेना नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे व संभाजीनगर चे जिल्हाप्रमुख तथा आमदार अंबादास दानवे यांनी घेतला असून या वर्धापन दिनासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विनंती करून निमंत्रित करण्यात आले,

 मुख्यमंत्र्यांनी सुद्धा एवढ्या मोठ्या कोरोना काळानंतर जनसंपर्क व्हावा जनतेशी हितगुज व्हावे या उद्देशाने आठ जून ला संभाजीनगर येथील मराठवाडा सांस्कृतिक सभाग्रह वर होणाऱ्या भव्यदिव्य सभेसाठी उपस्थित राहण्याचा शब्द दिला मुख्यमंत्र्याची मराठवाड्यात खूप दिवसाने सभा होत असल्याने तेथे मोठा जनसागर उसळला जाणार आहे यामुळे संभाजीनगर पासून दूर असणाऱ्या लातूर जिल्ह्यामध्ये शुभ शनी कला व शिवसैनिकांना व जनतेला त्रास होऊ नये या उद्देशाने धाराशिव चे खासदार ओमराजे निंबाळकर व आमदार संतोष सांबरे यांना लातूर जिल्ह्यात सभा घेण्याचे व तेथील आढावा घेऊन अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या.

 गेल्याने खासदार ओमराजे निंबाळकर व आमदार संतोष सांबरे यांची निलंगा विधानसभेत हलगरा येथे 4 जून रोजी सायंकाळी सहा वाजता तर औसा विधानसभेतील कासार शिरशी येथे सायंकाळी सहा वाजता जाहीर सभा होणार असल्याची माहिती आज लातूर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली याच बरोबर जिल्हाभरात संघटन बांधणी मी व पक्ष वाढीच्या दिशेने शिवसेना पदाधिकारी मोठ्या जोमाने कामाला लागले असून लवकरच शिवसेना पक्षबांधणी मध्ये लातूर जिल्हा एक आगळावेगळा ठसा उमटवलेला दिसेल व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये शिवसेनेचा भगवा डौलाने फडकताना दिसेल हेही यावेळी सांगण्यात आले या पत्रकार परिषदेमध्ये प्रास्ताविक हरिभाऊ सगरे यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत